गोदावरी नदीकाठच्या गावांना पूर परिस्थितीबाबत सतर्कतेच्या सूचना

नांदेड (एनएनएल) जायकवाडी धरणातील अतिरिक्त जलसाठयाचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्याची शक्याता असून या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना व तेथील स्थानीक प्रशासकीय यंत्रणेला पूर परिस्थितीबाबत सावधगिरी व सतर्क राहण्याच्या  सूचना देण्याशत येत आहेत. नागरीकांनी कुठल्यााही प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवता सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 


जायकवाडी धरणाची पाणी पातळी मंगळवार 19 सप्टेंबर रोजी 88.10 टक्केत क्षमतेने भरली आहे. उर्ध्व भागातील धरणांमध्ये जवळपास 100 टक्के् पाणीसाठा झाला आहे. पुढील काळात केंव्हाही अतिरिक्त जलसाठयाचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्याची शक्येता निर्माण होऊ शकते आणि या विसर्गामुळे धरणाखालील भागातील गोदाकाठच्या गावांना आगामी काळात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. वेळोवेळी होणाऱ्या जलसाठा  विसर्गामुळे प्राधिकार क्षेत्रील नदीकाठच्या् गावांना व तेथील स्थानीक प्रशासकीय यंत्रणेला पूर परिस्थितीबाबत सावधगिरी व सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.  
      
दारु विक्री बंदचे आदेश
नांदेड जिल्ह्यात व शहरात शनिवार 30 सप्टेंबर 2017 रोजी दसरा व रविवार 1 ऑक्टोंबर रोजी दुर्गादेवी, शारदादेवी विसर्जन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवा दरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश काढले आहेत. या आदेशात म्हटले आहे, शनिवार 30 सप्टेंबर रोजी  दसरा असल्याने जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या व रविवार 1 ऑक्टोंबर रोजी दुर्गादेवी, शारदादेवी विसर्जन निमित्त नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष). एफएल-4, एफएल / बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे.  




Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी