सरसम शिवारातील शेती पिकात रान डुक्करांचा हैदोस.. ज्वारीचे नुकसान

हिमायतनगर (एनएनएल) तालुक्यातील मौजे सरसम शिवारातील शेतकरयांच्या शेतात रानडुकराणी  हैदोस माजवून एकराहून अधिक ज्वारीच्या पिकाचे नुकसान केले आहे. या नुकसानीचे भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी वनविभागाकडे केली आहे.

यंदा अल्प पर्जन्यमानामुळे सोयाबीन, मूग -उडीद हातचे गेले. आता कापूसही नुकसानी आले आहे.
ज्वारीचे जेमतेच चांगली परिस्थिती असताना रानडुकरांचा धुमाकूळ शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडत आहे. असाच प्रकार तालुक्यातील मौजे सरसम बु.शिवारात घडला असून, येथील शेतकरी कोंडयाबाई दिगंबर शिंदे यांच्या शेत सर्वे क्रमांक १९८/१ मध्ये २ बैग ज्वारीची पेरणी केली. पिके जोमात आले असल्याने शेतकरी आनंदित होता, मात्र काल रानडुकरांचा कल्पने ज्वारीत घुसून पिकाचे पूर्णतः नासाडी केली आहे. त्यामुळे पीक उध्वस्त होऊन मोठे नुकसान झाले आहे. या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सौ.संध्याताई डोके यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी