पोलिस बंदोबस्तात आंबेडकर चौक ते परमेश्वर मन्दिर रस्त्यावरील अतिक्रमण हटवन्यास सुरूवात

हिमायतनगर, प्रतिनिधी/ गतवर्षी नव्यानेच अस्तित्वात आलेल्या हिमायतनगर नगरपंचायतीने शहरात अस्तव्यस्त वाढलेल्या अतिक्रमणावर हाथोड़ा उगारला असुन स्वच्छ शहर सुंदर शहराच्या दृष्टीने उचललेल्या या पावलामुळे  शहरातील आंबेडकर चौक ते परमेश्वर मंदिर रास्ता मोकळा श्वास घेणार आहे . 

हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक हा रास्ता 45 फुटाचा करण्यात येत आहे. सध्य परिस्थितीत हा रस्ता केवळ 20 ते 25 फुटाचा असून रस्त्याच्या दुतर्फा अस्तव्यस्त वाढलेल्या अतिक्रमणाने रस्त्याने वाहन चालवने अवघड बनले आहे. या मुख्य रस्त्यावर दिवाणी न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, टेलीफोन भवन, डाक घर आदिसह अनेक शासकीय कार्यालये असल्याने या भागात रहदारी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या रस्त्याने शाळा, कॉलेजसह बाजारकृंची नेहमीच वर्दळ सुरु असल्यामुळे पादचारी व वाहनधारकांना रस्त्याने चालताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. हि बाब लक्षात नगरपंचायतीने या रस्त्यासाठी नागरी व दलित वस्ती सुधार योजनेतून मोठा निधी मंजूर करून आणला. त्यामुळे सदर रस्त्याचे सिमेंटीकरण व नाली बांधकाम होणार आहे. हि बाब लक्षात घेता काम सुरु करण्याअगोदर संबंधित दुकानदार, नागरिकांना नोटीस देऊन अतिक्रमण स्वतःहून काढण्याचे सूचित केले. अनेकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रम काढले असून, ज्यांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला अश्यांचे अतिक्रमण दि.२२ शनिवारी चोख पोलिस बंदोबस्तात काढन्यास मुख्याधिकारी नितीन बागुल, नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद व अन्य नगरसेवक यांच्या उपस्थिती   शुरूवात केल्याने गुदमरलेल्या शहराला मोकळा स्वास् घेता येणार आहे. सदर अतिक्रमण काढताना पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण, उपनिरीक्षक नितीन गायकवाड, यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त लावूं जेसीबी मशीनद्वारे अतिक्रमण काढण्यात आले आहे. रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आल्याने रस्त्या रुंद होऊन शहराच्या विकासात व सौंदर्यात्मक भर पडणार असल्याचे जागरूक नागरिकांचे म्हणने आहे. 

बाजार मार्केटच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढा 
------------------
याच प्रमाणे शहरातील जिल्हा परिषद पडकी शाळा ते पोलीस स्थानक यासह अन्य मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे. कारण या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे सण, उत्सव आणि सार्वजनिक जयंती मिरवणुकीसाठी मोठे अडथळे निर्माण होतात. तसेच बाजारात ये जा करणार्यांना वाहन व पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, या अडथळ्यातून मुक्ती द्यावी. आणि मुख्य रस्त्यावर झालेले अतिक्रमणासह शहरातील बड्या घरमालकांनी केलेले हवाई अतिक्रमण व बाजार मार्केटच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे अशी रास्त मागणीही नागरीकातून केली जात आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी