लिंबोटीचे पाणी उदगीरला देऊन लोहा-कंधारचे वाळवंट केले- शंकर अण्णा धोंडगे


कंधार (मयुर कांबळे) राज्याच्या सेना - भाजप सरकारने दि.०९/०८/२०१६ लालोहा - कंधार तालुक्यातील एकमेव सिंचनाच्या मध्यम प्रकल्प लिंबोटी धरणाच्या जलाशयातून ६.९७१ द. ल. घ. मी. पाणी उदगीर साठीच्या आरक्षणास मंजूरी देऊन या भागावर मोठा अन्याय केला असून भविष्यात लोहा-कंधारचे वाळवंट होईल असे मत शेतकरी नेते व माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषेदेत व्यक्त केले असून दिनांक १७ अॉगष्ट रोजी लोहा येथे या निर्णयाच्या विरोधात आमदार व राज्य सरकार यांच्या जाहीर निषेध मोर्चाचे आवाहनही केले.

याबाबत मागील मे महिन्यात राज्याचे जलसंपदा मंत्री ना.शिवतारे व ना.गिरीश महाजन यांना निवेदन देऊन यामध्ये लोहा-कंधार हा परिसर कोरडवाहू असल्याने यापुर्वी मानार नदीवर बारुळ येथे ५५ वर्षापूर्वी धरण होऊन या भागातील अनेक गावे विस्थापित होऊन मोठ्या प्रमाणावर शेतजमीनी पाण्याखाली गेल्या पण त्याचा लाभ मात्र बिलोली व नायगांव तालुक्याला झाला.याच मानार नदीवर लिंबोटी येथे उर्ध्व मानार प्रकल्प ३०वर्षापुर्वी मंजूर होऊन तो आता ८० टक्के पुर्ण झाला.मागील १९९५ च्या सेना-भाजप सरकारच्या काळात ३० टक्के पाणी लातूर जिल्ह्यातील अहमदपुर तालुक्याच्या सिंचनासाठी देण्याचा निर्णय झाला.त्यानंतर अहमदपुर शहिदाच्या पिण्याचा पाणी पुरवठाही येथुन करण्यात आली.धरणाच्या लाभ क्षेत्रात लोहा-कंधार शहर व ग्रामीण यांचेही पिण्याच्या पाण्याचे आरक्षण असून कंधार शहरासाठी सन २०१३ मध्ये पाणी पुरवठा मंजूर करण्यात आला.

आजच्या स्थितीत लोहा-कंधारचा एकमेव शेती सिंचनाचा प्रकल्प असून ७००० हेक्टर जमीन बारमाही ओलिताखाली ३५ गावे येऊन ६० कि.मी.मुख्य कालवा असून महाराष्ट्रात व देशात प्रथमच जमीनी अंतर्गत पाणीपुरवठा पाईप लाईन द्वारे करण्याचा यशस्वी प्रयोग सन २०११ साली झाला  असतांना व याचा भविष्यात या भागातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच लाभ उदगीरला पाणी देण्याच्या स्थानिक सेनेचे आमदार  व सरकारच्या सहकार्याने झाला असल्याने या भागाचे न भरून निघणारे नुकसान होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोहा-कंधारच्या वतीने या विरोधात आवाज उठाविण्यात आला होता.पण स्थानिक आमदाराची मुंबईत सेटींग व मतदार संघात चिटींग ह्या दुटप्पी भुमिकेमुळे जनतेचे नुकसान होत आहे.यामागील गौडबंगाल व किती मलिदा लाटला हे भविष्यात जनतेसमोर येईलच.हा मतदार संघ कुणाची जहागीर नसून या अन्याया विरोधात आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ,वे पडल्यास न्यायालयातही जाऊ पण अशा लबाड व बोलबच्चन, जनतेच्या हक्काच्या व विकासाचे लिलाव करणा-याचे मनसुबे धुळीला मिसळू असाही संकल्प माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी शेवटी बोलतांना व्यक्त केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी