खुल्या समरगित स्पर्धेत कामगार कल्याणकेंद्र चौफाळा प्रथम

नविन नांदेड(प्रतिनिधी)महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट नांदेडच्या वतीने आयोजीत खुल्या समरगीत स्पर्धा 2016-17 मध्ये कामगार कल्याणकेंद्र चौफाळा प्रथम तर द्वितीय कामगार कल्याण केंद्र वसमत हे आले आहेत. 

या स्पर्धेत एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र मंडळ गट नांदेडच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी कामगार कल्याण केंद्र सिडको येथे खुल्या समरगीत स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले होते. यात एकूण 12 संघांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळ सदस्य शिवाजीराव धर्माधिकारी तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला बाल कल्याण शिक्षण व आरोग्य मनपाच्या उपसभापती डॉ.ललिता बोकारे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत कामगार कल्याण केंद्र चौफाळा प्रथम नगदी 1500 व प्रमाणपत्र, द्वितीय कामगार कल्याण केंद्र वसमत नगदी 1000 व प्रमाणपत्र, तृतीय कामगार कल्याण केंद्र परभणी नगदी 700 व प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ कामगार कल्याण केंद्र हदगाव व कामगार कल्याण केंद्र मिलगेट यांना प्रत्येकी 500 व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीसाठी कामगार कल्याण अधिकारी सी.बी.जाधव, यांच्यासह केंद्र संचालक साखरे, साईनाथ राठोड, मेंडके, एस.डी.सावंडकर, जावेद, कल्याणकर, अवचार, व स्थानिक कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महिला व नागरीकांसह युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी