दोन हजारांची लाच घेणारा तलाठी झाला गजाआड

नांदेड (प्रतिनिधी) वडिलांच्या मृत्यू नंतर आईच्या नावावर शेती फेरफार करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या तलाठी अन्नपवाड याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे. 
तलाठी सज्जा देवठाणा ता.भोकर येथील तलाठी नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड याने एका शेतकऱ्याला त्यांची जमीन वडिलांच्या मृत्यू नंतर आईच्या नावावर करून देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागितली.

त्या शेतकऱ्याने ९ ऑगस्ट रोजी या बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.लाच मागणीची पडताळणी झाल्या नंतर आज दुपारी भोकर शहराच्या वडार गल्लीत असलेल्या तलाठी नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड यांच्या खाजगी कार्यालयात सापळा रचला आणि २ हजारांची लाच स्वीकारताच तलाठी नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड यास जेरबंद केले.या लाचखोरीबाबत तलाठी नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड विरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक संजय लाटकर, अपर पोलीस अधिक्षक  एस.आर. चव्हाण, पोलीस उप अधिक्षक  संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पी.एन.उलेमाले, बळवंत पेडगावकर, पोलीस कर्मचारी शेख चांद, बाबू गाजुलवार,सुरेश पांचाळ,शेख मुजीब यांनी पार पाडली. लाच लुचपत विभागाने जनतेला  आवाहन करण्यातकेले की, शासकीय अधिकारी/कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडीओ, ऑडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबधाने कांही माहिती असल्यास  किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती असेल तर खालील क्रंमाकावर संपर्क करावा. टोलफ्री हेल्पलाईन क्रंमाक- १०६४ आणि  कार्यालयाचा फोन क्रंमाक ०२४६२-२५३५१२ तसेच पोलीस  उप अधिक्षक संजय कुलकर्णी,  मोबाईल क्रंमाक ८५५४८५२९९९ वर पण भ्रष्टाचार बाबत तक्रार करता येणार आहे आणि दाद मागता येणार आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी