NEWS FLASH १) पाण्यात बुडाल्याने तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू,.....२) स्वस्त धान्य दुकानदार अपंगांची फसवणूक करीत आहे,......३) खतांचा पुरवठा त्वरित करा, अन्यथा भाजपच्या वतीने जनआंदोलन - संदीप केंद्रे,.....४) राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के दरवर्षी प्रमाणे मुलींची बाजी,...५) 1 लाख 72 हजारांच्या दागिन्यांसह चोरटा स्थागुशाने पकडला,.....६) लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यावर गुन्हा दाखल,.....७) कॉन्वेजीनियसचा १०० दशलक्ष विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार,.....८) कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी घरनिहाय सर्वेक्षणावर भर - डॉ. विपीन,....९) कोरोना विषाणूने दीड शतकाजवळ दिले नवीन रुग्ण, आज १३४ बाधीत रुग्ण; नांदेड शहरात ४६; ग्रामीण भागात ८८,.....१०) साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, ..., **

मंगलवार, 8 मार्च 2016

अलंकार सोहळा संपन्न

वेदशास्त्रींय मंत्रोच्चारात श्री परमेश्वराचा अलंकार सोहळा संपन्न


हिमायतनगर(अनिल मादसवार)
महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर हर हर महादेवच्या जयघोषात वाढोण्याचे जागृत देवस्थान श्री परमेश्वराचे लाखो भावीकांनी दर्शन घेतले. तसेच कीर्तनानंतर मध्यरात्रीला वेदशास्त्रींय मंत्रोच्चारात श्री परमेश्वराचा महाअभिषेक तहसीलदार शिंदे यांच्या हस्ते होऊन श्रीचा अलंकार सोहळा विश्वस्त मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

लाखो भावीकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री परमेश्वराचे महाशिवरात्री दिनी माजी आ.माधवराव पाटील व विद्यमान आमदार नागेश पाटील यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांनी दर्शन घेतले. भक्तांच्या अलोट गर्दीमुळे सायंकाळी ८ वाजेपर्यंत श्री दर्शनाला रांगा लागल्या होत्या. रात्री 8.30 वाजता हभप. सतीश महाराज यांच्या कितर्नाचा कार्यक्रम संपन्न होताच शिवापती मंदिरातील शिव - पावर्तीचा महाअभीषेक सोहळा मध्यरात्री 01 ते 3 च्या दरम्याण संपन्न झाला. त्यानंतर मंदिर संस्थानचे पदसीध्द अद्यक्ष गजानन शिंदे यांच्या हस्ते पुरोहीत कांतागुरु वाळके यांच्यासह पाच ब्राम्हण गुरुंच्या वेदशास्त्रींय मंत्रोच्चाराच्या जयघोषात अभीषेक व महापुजा संपन्न झाली. पूर्वीपासून चालत आलेल्या वतनदारांच्या पुजेनंतर मध्यरात्री उशीरा श्रीच्या मुर्तीला सोने, चांदीचा अलंकार, टोप, चंद्रहार, दोन, तीन व पाच पदरी हार, कर्णकुंडल, आदींसह अन्य आभुषने मंदिराचे विश्वस्त संचालक मंडळींंच्या उपस्थीतीत चढवीण्यात आली. श्रीच्या मुर्तीवरील अलंकार दहीहांडी गोपाल काल्यापर्यंन्त ठेवन्यात येतात. या अलंकार विभुशीत श्री परमेश्वराची मुर्ती पाहुन भावीक भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटतात. 

शिवरात्रीच्या दुस-या दिवशी दि.०८ मंगळवारी परंपरेनुसार शहरातील भक्तगण व मानकरी भक्तंाकडुन बँड - बाज्याच्या गजरात मिरवणुक काढुन महादेवाला भगवे झंडे अर्पण करून पुजा- अचर्ना करण्यात आली. तसेच श्री परमेश्वराच्या चरणी दाळ - भात, पुरण - पोळी व गुळाचे नैवेद्य दाखऊन पारण्याचा उपवास सोडला. हा अदभुत व भक्तीमय सोहळयाचा संगम पाहण्यासाठी तालुक्यासह विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, आंध्रप्रदेशासह राज्यातील कानाकोप-यातुन भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. 

विश्वस्तांच्या पुढाकारातून मंदिर विकासाची घौडदौड सुरुच..

गेल्या अनेक वर्षापासून येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टने धार्मिक कार्यक्रमाबरोबर आता सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला असून, दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वितरण, विविध सन उत्सवाला अनुसरून कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तसेच मंदिर परिसरातील विकास कामाची घौड दौड दर्शनार्थी भक्ताच्या देणगीतून आणि तीर्थ क्षेत्र निधीतून सुरु आहे. आजवर मंदिराच्या विश्वस्त कमेटीच्या देखरेखीत नांदेड - किनवट राज्य रस्त्यावर भव्य अशी कमान, मंदिराचे प्रवेशद्वार, परिसरात चार व्यापारी दालन, लागण सोहळे पार पाडावे यासाठी परमेश्वर मंगल कार्यालयाची निर्मित्ती, मंदिर परिसराचे सिमेंटीकरण, दर्शनार्थी भक्ताना पिण्याचे शुद्ध पाण्यासाठी वोटर पुरीफाय आर. ओ. मशीन बसविण्यात आली आहे. तसेच गेल्या तीन वर्षापासून वाचकांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाचनालय, गोर गरिबांच्या सुख दुखासाठी अल्प दारात रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. तसेच मंगल कार्यालय परिसरात व्यापारी संकुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, लवकरच याचे लोकार्पण करण्यात येणारा असल्याची माहिती उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली. यावेळी सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, सदस्य लक्ष्मणराव शक्करगे, किशनराव मादसवार, भास्कर दुसे, देवीदास मुधोळकर, शाम पवनेकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, संभाजी जाधव, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, आनंता देवकते, मुलचंद पिंचा, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर व लिपीक बाबुरावजी भोयर, गावकरी मंडळी उपस्थीत होते. 

बंदोबस्ताची पाहणी व सपत्निक दर्शन 

दरम्यान मंदिर दशर्नसाठी आलेले भावीक व अंलकारमय श्री मुर्तीच्या संरक्षणासाठी पोलीस अधिक्षक परमजितिसंह दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुरेश दळवी यांनी मंदिर परीसरात बंदुकधारी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त लावला. तसेच यातर उत्सव काळात भक्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, जमादार व पोलिस कर्मचार्यांच्या कडक बंदोबस्त लावला असून, १५ दिवस चालणाऱ्या यात्रेत होणार्या, टवाळखोर्या, चोरी आदी घटनांवर नजर ठेवण्यासाठी पोलिस कुमक मागविणार असल्याचे सांगितले. त्यानंतर मंदिर परिसराची पाहणी करून श्री दळवी यांनी सपत्निक अलंकारमय श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन पूजा - अर्चना केली. मंदिर समितीचे जेष्ठ संचालक लक्ष्मण शक्करगे यांच्या हस्ते छायाचित्र देवून सत्कार करण्यात आला.

शनिवार, 5 मार्च 2016

यात्रा महोत्सव सुरु

महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला श्री परमेश्वरच्या 
महाअभिषेकने सुरुवात
 हिमायतनगर(प्रतिनिधी)महाशिवरात्री निमित्त येथील जाज्वल्य श्री परमेश्वर देवस्थानच्या भव्य यात्रा महोत्सवाला महाअभिषेक, ग्रंथराज ज्ञानेश्वरी व विना पारायण सोहळ्याने शनिवार दि.०५ मार्च पासून सुरुवात झाली आहे. पहिल्याचा दिवशी पारायणासाठी महिला, मुलीनी पारायणास लक्षणीय उपस्थिती लावली तर हजारो भाविकांनी दर्शन घेवून अभिषेक केला.

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी शंकररुपी अवतारातील उभी असलेलि काळ्या पाषाणातील श्री परमेश्वराची सगुणरूप मूर्ती याच पर्व काळात शेतीची नांगरठी करताना शेकडो वर्षापूर्वी एका शेतकऱ्याला सापडली होती. तेंव्हा गावकर्यांनी या ठिकाणी मंदिराची उभारणी करून महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य यात्रा उत्सव साजरा केला. तेंव्हापासून महाशिवरात्रीच्या पर्वकाळात जवळपास पंधरा दिवस यात्रा भरविली जाते. दरम्यान मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु असते. माघ कृ.११ दि.०५ शनिवार पासून यात्रेला सुरुवात झाली असून, सकाळी ६ वाजता श्रीचा महाभिषेक मंदिर संस्थांचे सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार यांच्या हस्ते करण्यात आला आहे. तसेच अखंड हरीनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायनाला सुरुवात झाली असून, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ श्री हभप. परमेश्वर महाराज डोल्हारीकर हे सांभाळत आहेत. तसेच त्यांच्या मधुर वाणीत पवित्र ग्रंथाचे पठण केले जात आहे. पहिल्याचा दिवशी शहरातील शेकडो महिला, पुरुष व बालभक्तानी ज्ञानेश्वरी पारायणात सहभाग घेतल्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. 

यात सामील झालेल्या परायणार्थी भक्तांना मंदिराच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ देण्यात आला असून, यात्रा महोत्सव काळात सप्ताहभर धार्मिक कीर्तन, पारायण, प्रवचन, तसेच विविध शालेय, कृषी आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तसेच महाशिवरात्रीच्या मध्यरात्री १२ नंतर श्रीच्या मूर्तीचा अलंकार सोहळा पुरोहितांच्या मंत्रोच्चारात केला जाणार आहे. त्यानंतर विविध स्पर्धा, प्रदर्शन व खेळाचे आयोजन करण्यात आले असून, या पर्व काळात पंचक्रोशीतील भाविक भाकत, शालेय विद्यार्थी व खेळाडूंनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष तहसीलदार गजानन शिंदे, उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, संचालक लक्ष्मणराव शक्करगे, किशनराव मादसवार, भास्कर दुसे, देवीदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, शाम पवनेकर, संभाजी जाधव, विठ्ठलराव वानखेडे,  सौ. लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, राजाराम बलपेलवाड, वामन बनसोडे, प्रकाश शिंदे, आनंता देवकते, मुलचंद पिंचा, माधव पाळजकर, श्रीमती मथुराबाई भोयर व लिपीक बाबुरावजी भोयर आणि समस्त गावकरी मंडळीनी केले आहे.

गुरुवार, 3 मार्च 2016

उत्तरपत्रिकेच्या छपाईत चुकीची पुनरावृत्ती

लातूर बोर्डाच्या दहावीच्या उत्तरपत्रिकेच्या छपाईत दोष, 
गतवर्षीच्या चुकीची पुनरावृत्ती, मात्र मनस्ताप विद्यार्थ्यांना....
नवीन नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर च्या वतीने घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षार्थ्यांना जवळपास वेगवेगळ्या प्रकारच्या चार उत्तरपत्रिका देण्यात येत असल्यामुळे परीक्षक व नियामक यांच्यात संभ्रम होण्याची शक्यता असून या पूर्वी परिसरातील एका शाळेला बोर्डाच्या चुका असतांनाही केंद्र प्रमुखांसह चौदा परीक्षार्थ्यांना लातूर बोर्डाच्या केवळ गलथान कारभारामुळे चकरा माराव्या लागल्यामुळे तोच प्रकार यावर्षी पुन्हा काही केंद्रावर निदर्शनास आला असून बोर्डाने तात्काळ सुधारणा करण्याची मागणी होत आहे.

एस.एस.सी बोर्ड परीक्षांना काल दि. 01 मार्च रोजी परिसरातील सहा केंद्रावर सुरुवात झाली. यात गतवर्षी एका परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार्‍या चौदा विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका बदलली असल्याचे कारण देवून विद्यार्थ्यांसह केंद्र प्रमुखांना बोर्डाने नोटीस पाठविली. त्यात त्यांनी स्पष्टीकरण स्वत: लातूर बोर्डात येवून देण्याचे कळविले. त्यावेळी विद्यार्थ्यांसह केंद्रप्रमुखात खळबळ उडाली. यात 20 पानी उत्तरपत्रिकेत अनेक पानावर गुणांकन देण्यात येणार्‍या रकान्यात परीक्षक व नियामक हे रकाने नसल्याचे निदर्शनास आले. गेल्या पंधरादिवसापूर्वी लातूर बोर्डाच्या वतीने विविध केंद्रावर उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्यानंतर संबंधित केंद्रातील शिक्षकांसह केंद्र प्रमुख यांनी सतर्क राहून यावेळेस च्या उत्तरपत्रीका तपासल्या असता याहीवर्षी तोच प्रकार पुन्हा निदर्शनास आला. यात 20 पानी पत्रिकेत प्रत्येक पानावर गुणांकनाच्या रकान्यामध्ये परीक्षक व नियामक यांनी द्यावयाचे गुण व स्वाक्षरी हा रकानाच नसल्याचे स्पष्ट दिसून आले तर काही ठिकाणी दोन, तीन रकाने दिसून येत आहेत. त्यामुळे संबंधित केंद्राने बोर्डालाही कळविले. परंतु काही विद्यार्थ्यांनी 01 मार्च रोजी आहे त्याच उत्तरपत्रिकेवर मराठी विषयाची परीक्षाही दिल्याचे समजते. त्यामुळे हा प्रकार बोर्डाचा असतांनाही विद्यार्थ्याच्या माथी का हा प्रश्न पडला असून बोर्डाने आता तरी उत्तरपत्रिका सुरळीत आणि सुव्यवस्थीत देण्याची मागणी होत आहे.

           हद्दीत दहा केंद्रावर दहावीच्या शालांत परीक्षांना सुरुवात
नवीन नांदेड :ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील दहा केंद्रावर 01 मार्चपासून दहावीच्या शालांत परीक्षांना कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत सुरुवात झाली असून केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नवीन नांदेड परिसरातील इंदिरा गांधी हायस्कूल या ठिकाणी 300 परीक्षार्थी परीक्षा देत असून केंद्र प्रमुख जे.ई. गुपीले हे काम पहातआहेत. तर कुसुमताई चव्हाण माध्य. विद्यालय सिडको केंद्र प्रमुख के.ए. जोशी हे कार्यरत असून या ठिकाणी 294 परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. शिवाजी हायस्कूल सिडको येथे केंद्रप्रमुख अशोक लघुळे हे काम पहात असून या ठिकाणी 300 परीक्षार्थी आहेत. नरहर कुरुंदकर कौठा येथे ......., महात्मा गांधी विद्यालय सिडको येथे 225 विद्यार्थी परीक्षा देत असून केंद्रप्रमुख पी.एम. सांगळे हे काम पहात आहेत. जुना कौठा येथील माधवराव वटेमोड विद्यालयात परीक्षा प्रमुख म्हणून जि.एच. लदाफ हे काम पहात आहेत. जि.प. हायस्कूल विष्णुपूरी , शिवशक्ती माध्य. विद्यालय काकांडी, राष्ट्रमाता मराठी उर्दु शाळा वाजेगाव, गोदावरी माध्य. विद्यालय पिंपळगाव याही ठिकाणी दहावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून अनेक विद्यार्थी या केंद्रावरपरीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रावर ग्रामीणचे पो.नि. गजानन सैदाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी, होमगार्ड आदींची नियुक्ती करण्यात आली असून परीक्षा केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षांना सुरुवात झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव कार्यरत सौ. बच्चेवार - आ. काळे
 
नवीन नांदेड : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सर्वांगीण विकासासाठी व्यक्तिमत्व विकास घडवून आणणार्‍या सहशिक्षिका सौ. भगीरथी बच्चेवार यांचे कार्य आदर्श असल्याचे प्रतिपादन आ. विक्रम काळे यांनी सेवानिवृत्ती निमित्त निरोप व सत्कार समारंभात केले. इंदिरा गांधी हायस्कूल येथील सहशिक्षीका तथा स्काऊट गाईडच्या कमिश्नर सौ. भगीरथी मारोती बच्चेवार या 33 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्याबद्दल इंदिरा गांधी हायस्कूलच्या शालेय समितीच्या वतीने निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस. एल.माचलोड, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आ. विक्रम काळे, साहित्यीक देविदास फुलारी, सामाजिक कार्यकर्त्या तस्लीम पटेल, आकाशवाणीचे भिमराव शेळके, स्काऊट गाईडचे संघटक दिगंबर करंडे, पर्यवेक्षक बि.बी. जाधव, एम.के. गायकवाड यांच्यासह मान्यवर पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. यावेळी आ. काळे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सर्वांगीण विकासासाठी व्यक्तिमत्व विकास घडवून आणणार्‍या सहशिक्षिका सौ. बच्चेवार यांचे कार्य उत्कृष्ट असल्याचे सांगीतले. तर प्रा. तस्लीम पटेल यांनी विद्यार्थ्यांना आईची ममता दिली, शेतकरी कुटुंबात व आदिवासी जमातीत जन्म घ्‌ेवून बिरसामुंडाची प्रेरणा घेवून शैक्षणिक कार्यात अग्रेसर भुमिका घेतल्याचे मत व्यक्त केले. यावेळी अंध विद्यालय धनेगावच्या संचाने सौ. मिरा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत गीत गायले. शालेय समितीच्या वतीने यावेळी सौ. भगीरथी बच्चेवार व जयवंत सोमावाड यांचा सहपरीवार सत्कार केला. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष ए.आर. बायस व एल.वाय. कोलेवाड यांनीही शाल, श्रीफळ व भेट वस्तु देवून सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.बी. जाधव, सुत्रसंचल व्हि.बी. शिंदे तर आभार सावते यांनी मानले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप एस.एल. माचलोड यांनी केला. कार्यक्रमास शिरफुले, बी.ई. चौधरी, आर.जी. बायस, नारवाड, निरपणे, सौ. सोनवणे, माजी मुख्याध्यापक डी.आर. राठोड, माजी पर्यवेक्षक सौ. इनामदार, सौ. सिंधुताई तिडके, सौ. गुमटे, एस.व्ही. पाटील, जे.ई. गुपिले, अमर बायस, बीबी गुपिले, डी.डी. काळे, डी.व्ही फुलारी, मस्के, उमाटे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

निराधार समिती बैठक.

खर्या गरजू निराधारांना लाभ मिळवून देणार - आ. नागेश पाटील आष्टीकर 

हिमायतनगर(प्रतिनिधी)खर्या गरजू निराधार लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी निराधार समिती सक्षम आहे. करिता लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव सर्व कागदपत्रासोबत सादर करावे. त्यावर विचार विनिमय होऊन सर्व निकषात बसणार्यांना शासनाच्या योजनेचा लाभ दिला जाईल असे ठोस आश्वासन हिमायतनगर निराधार समितीचे अध्यक्ष तथा हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी केले. 
ते येथील तहसिल कार्यालयात दि.०२ बुधवारी घेण्यात आलेल्या निराधार समितीची पहिल्या बैठकी प्रसंगी लाभार्थ्यांना बोलत होते. यावेळी अनेक जेष्ठ नागरिकांनी राजीव गांधी, श्रावण बाळ, संजय गांधी आदी योजनेत बसणाऱ्या जवळपास २५० हून अधिक लाभार्थ्यांनी अापले प्रस्ताव दाखल केले. यावेळी दाखल झालेल्या प्रस्तावावर आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी स्वाक्षर्या केल्या. तसेच दाखल झालेल्या फाईलवर समिती अध्याक्ष यांनी बारकाईने नजर टाकून अनेक वयोवृद्ध नागरिकांना पगारीचा लाभ नक्की मिळवून देईल असे सांगितले. परंतु यापैकी किती लाभार्थी पत्र ठरले हे समजू शकले नाही. याप्रसंगी तहसीलदार गजानन शिंदे, गटविकास अधिकारी विलास गंगावणे, राम ठाकरे, गजानन तुपत्तेवार, विशाल राठोड, शंकर पाटील, बालाजी राठोड, स्वीय्य सहाय्यक बंडू पाटील, विजय वळसे, विठ्ठल ठाकरे, किशनराव पाटील, माराेतराव साेनारीकर, सावण डाके, गणेशराव पाटील, रामराव पाटील, संजय काईतवाड, पवन करेवाड, राजू पाटील, परमेश्वर पानपटे, संतोष गाजेवार, साईनाथ धोबे, साै चंद्रकलाबाई गुडेटवार, इंगळे बाई यांच्यासह, निराधार योजनेचे काम पाहणारे सोनकांबळे, व इतर कर्मचारी व वयोवृद्ध लाभार्थी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आता तरी दलालांना चाप बसेल काय...?
--------------------
विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील शेकडो निराधार लाभार्थी नवीन प्रस्ताव दाखल करून तहसील कार्यालयाच्या चकरा मारून हैराण झाले आहेत. तर ज्यांना मानधन मिळते ते लाभार्थी दलालाच्या टक्केवारीमुळे त्रस्त झाले आहेत, उशिरा का होऊन निराधारांची बैठक बुधवारी झाली. गत काळात लाभ मिळत असलेल्या निराधार महिलांना आजही काही दलाल मासिक पगाराच्या वेळी आपले कमिशन काढून घेतात हे वास्तव अनेकांनी बोलून दाखविले. नव्याने पत्र ठरणाऱ्या खर्या व गरजू लाभार्थ्यांना न्याय मिळावा अशी रास्त अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. नवनिर्वाचित आ. आष्टीकर यांच्या काळात तरी निराधारांच्या पगारीवर डोळा ठेवणाऱ्या दलालांना चाप बसेल काय..? असा प्रश्न उपस्थित लाभार्थ्यांच्या चर्चेत समोर आला आहे.

वाचकांना निवेदन

नांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.
नांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या शा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...
anilmadaswar@gmail.com, nandednewslive@gmail.com