NEWS FLASH 1..गणेशोत्सवाबरोबर विधानसभेच्या निवडणुकीचीही होतेय जोरदार चर्चा,2..नांदेड जिल्ह्यात 3 हजार सार्वजनिक गणेश मुर्ती स्थापन होण्याची शक्यता,3...गुटख्याच्या तस्करीवर जरब आणणारे नांदेड पोेलिस नवी दिल्लीच्या बक्षीसास पात्र ठरतील, 4...उत्सव काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास खपवून घेणार नाही – अ.अखिल अ.हमीद, 5...उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल, 6... मराठवाड्यात दुष्काळमुक्तीसाठी ‘वॉटर ग्रीड’ योजनेतून पाण्याची व्यवस्था – मुख्यमंत्री फडणवीस, 7...माहूरच्या रामगड किल्यात प्रेमी युगलाचा खुन केल्याच्या आरोपातील 11 जणांची मुक्तता, 8...आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचाच माणूस विरोधी पक्ष नेता असेल – मुख्यमंत्री, ..., **

मंगलवार, 14 जुलाई 2015

कन्यारत्नाचे स्वागत

सरसममध्ये कन्यारत्नाचे जोरदार स्वागत....

हिमायतनगर(कानबा पोपलवार)तालुक्यातील मौजे सरसम येथील रहिवाशी असलेले श्री व सौ. गोडसेलवार यांना कान्यारत्नाच्या रुपात दुसरे आपत्य सोमवार दि.१३ जुलै रोजी झाले आहे. घरी लक्ष्मी आल्याची आनंदाची वार्ता ऐकून परिवारातील सदस्यांनी जिलेबीचे वाटप करून मुलीचे जोरदार स्वागत केले आहे. 

मुलाच्या प्रमाणात मुलीचे जनम दर मोठ्या प्रमाण कमी होत चालला आहे. हि घटती संख्या लक्षात घेता राज्य शासनाने बेटी बचाव अभियान चालवून भ्रूण हत्या टाळा, मुलापेक्षा मुलगी बरी...प्रकाश देते दोन्ही घरी..., बेटी बचाओ.... समाज बचाओ यासह विविध पद्धतीने मातृत्वाचे महत्व पटवून देत मातृशक्तीला वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार सुरु आहे. या आवाहनाला शहरासह आता ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे. 

दि.१३ रोजी तालुक्यातील सरसम येथील रहिवाशी सौ.रोहिणी गोविंद गोडसेलवार यांच्या पोटी सलग दुसरे कन्यारत्न जन्मले आहे. या आनंदात त्यांनी येथील दवाखान्यात त्यांनी कुटुबा समवेत जिलेबीचे वाटप करून आनंद साजरा केला. त्यांना पहिली यशश्री हि मुलगी पाच वर्षाची असून आता दुसरे कन्यारत्न जन्मले आहे. सदर मुलीचे लवकरच तेजश्री असे नामकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर मुलीच्या जन्माअगोदर त्यांनी गरोदर मातेस सरसम बु.येथील प्राथमिक रुग्णालयात नेले होते. येथील डॉक्टरना तीन वेळेस फोन लाऊन व नर्सला प्रत्यक्ष बोलावून सुधा कोन्हीही आले नसल्याने शेवटी नाईलाजास्तव त्यांना हिमायतनगर शहरातील खाजगी रुग्णालयात न्यावे लागल्याचेहि ते म्हणाले. शासकीय रुग्णालयात रुग्णांसोबत कशी वागणूक दिली जाते हे यावरून स्पष्ट होत आहे.

शुक्रवार, 10 जुलाई 2015

अन्न, वस्त्रासह, आर्थिक मदत

वडगाव ज.पिडीतग्रस्तांना आ.आष्टीकरांनी दिला मायेचा आधार  


हिमायतनगर(कानबा पोपलवार) तालुक्यातील मौजे वडगाव ज.येथील आगीत भस्मसात झालेल्या घराच्या कुटुंबाना दि.०९ गुरुवारी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी अन्न, धान्य, कपडे व आर्थिक मदतीचा हात पुढे करून भरघोस मदत देवून मायेचा आधार दिला आहे.  

दि.०६ जुलै च्या मध्यरात्री तालुक्यातील मौजे वडगाव ज.येथील घरांना आग लागून ११ लाखाचे नुकसान झाले होते. या घटनेचा पंचनामा महसूल विभागाचे तलाठी श्री शिंदे यांनी करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. या घटनेत संसार उपयोगी व शेती साहित्य व रोख रक्कम भस्मसात झाल्याने आता जगायचे कसे ...? असा प्रश्न गंगावलेल्या शेतकर्यासमोर उभा टाकला आहे. शासनाची तुटपुंजी आर्थिक मदतीवर संसाराचा डोलारा उभा कसा करायचा वर्षभर गुजराण करायची तरी कशी..? असे एक ना अनेक प्रश्न घरे उध्वस्त झालेल्या कुटुंबासमोर होती. घटना घडल्याने अनेक नेत्यांनी जाळीत शेतकऱ्यांची भेट देवून केवळ सांत्वन केले. परंतु आश्वासनाशिवाय दुसरे काहीच दिले नाही, तर शहरातील वासवी क्लबच्या लोकानी भेट देवून अन्न धान्य देवून त्यांचे अश्रू पुसून मायेचा आधार दिला आहे.

घटनेच्या काळात मुंबईला गेलेले हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आ.नागेश पाटील आष्टीकर परत येताच प्रथम त्यांनी जळीत घटनेच्या वडगाव ज. येथे भेट दिली. या ठिकाणी भेट देवून नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाची आस्थेवाईकपने चौकशी केली. आणि आधार देत प्रत्येक कुटुंबियांना २ क्वीन्टल अन्न धान्य, कपडे, साडी, लुगडे, चिमुकल्यांना कपडे, व रोख १० हजारची आर्थिक मदत केली. तसेच लवकरच घरकुल व शासनाकडून अधिकाधिक तातडीची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या मदतीने भारावलेल्या शेतकर्यांनी " आमदार म्हणजे खरच जनता राजा " अश्या कृतज्ञ शब्दांनी पिडीत कुटुंबांच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. 

तसेच त्यांच्यासोबत आलेल्या परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी यांनी पिडीत कुटुंबास प्रत्येकी ५ हजारची मदत, आणि बजरंग दलातर्फे कुटुंबियांना २ हजारची आर्थिक मदत सुपूर्द केली. या सर्वांच्या मदतीच्या हातभाराने पिडीत कुटुंबियांना जगण्याची नवी उर्जा मिळाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा दरवर्षी शेतकर्यांना फटका बसत असल्याने गतवर्षीच्या दुष्काळातून शेतकरी अजून सावरला नाही. तोच आगीत घरे उध्वस्त झाल्याने वडगावच्या दहा कुटुंबांचा संसार उघड्यावर आला होता. यावेळी पोलिस पाटील, सरपंच, गावकरी नागरिक, शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.   

कायमस्वरूपी पाणी मिळवून देईन

हिमायतनगर - हदगाव तालुक्याला शाश्वत पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - आ.आष्टीकर


हिमायतनगर(अनिल मादसवार) हदगाव हिमायतनगर तालुक्यात राबविल्या जात असलेल्या नळ योजनेची तब्बल १५० करोडोची रक्कम देणे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील तालुक्यातील जनतेला पाणी उपलब्ध नसल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हि समस्या कायमरुपी सोडविण्यासाठी २०० कोटीच्या खर्चातून एम.जी.पी.मार्फत शाश्वत व शुद्धपाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी माझे प्रयत्न सुरु आहेत. असे प्रतिपादन हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर येथील नगरपंचायतीचा प्रशासक पदाचा चार्ज तहसीलदार शरद झाडके यांनी स्वीकारल्यानंतर दिलेल्या भेटीत बोलत होते. 

यावेळी हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल शिवसेनेचे आ.नागेश पाटील आष्टीकर व प्रशासक शरद झाडके यांचा शहरातील प्रतिष्ठीत नागरिक व पत्रकारांच्या वतीने सत्कार करून शहरातील नागरिकांना मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले कि, पैनगंगा नदीवर जनतेची कोणतही मागणी नसताना १४२ कोटीच्या खर्चातून मंगरूळ येथे बंधारा बांधण्यात आला. एवढा निधी खर्च करूनही केवळ १० कि.मी.पर्यंत पाणी साठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न जैसे थेच राहून पाणी टंचाई उद्भवणार आहे. कायमरुपी पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी एम.जी.पी.मार्फत इसापूर धरणातून हदगाव -हिमायतनगर तालुक्यासाठी पाणी आणण्याच्या प्रयत्नात आहे. शासनाचे १५० कोटी आणि एम.जी.पी.च्या माध्यमातून २०० कोटीच्या खर्चातून होणार्या सिंचनातील खर्च आणी उपयोग यातील फरक निदर्शनास आणून दिला आहे. त्यामुळे राज्यशासन ५० केंद्रशासन ५० टक्के निधी म्हणजे १०० कोटीमध्ये हि योजना कार्यान्वित होऊन शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी मला वारंवार मुबईला जावे लागत आहे. मी काही कोणता मोठा माणूस नाही जे कि माझे काम फोनवर होईल, म्हणून मला मंत्रालयात जावून अधिकार्यांना भांडून काम करून घ्यावे लागत आहे. यानंतर दोन्ही तालुक्यातील जनतेच्या कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याच्या प्रश्न सुटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

विरोधी पक्षाकडून आजचे आमदार हे काँग्रेस कार्यकर्ते होत..! या पद्धतीने होत असलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले कि, मी काय.? कोणत्या पक्षाला जन्मलेला नाही. त्यासाठी विरोधकांनी पक्षाबाबत न बोलता विकास कामे करून घेण्यावर भर द्यावा. पक्ष हे निवडणुका पुरते असतात, विकास कामात कोणताही पक्ष नसून, आज मी सर्वांचाच आमदार आहे. या जिल्ह्याचे मुख्यमंत्री असताना नायगाव, हिमायतनगर नगरपंचायतीची घोषणा झाली. मग या दोन्ही ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा का..? मिळवून दिला नाही. असा सवालही त्यांनी करून मी काही एवढे कोटी आणीन असे आश्वासन देणार नाही. परंतु चांगल्या सुविधा व शाश्वत पाण्यासह जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करीन असे ठणकावून सांगितले. यावेळी पं.स. सभापती आडेलाबाई हातमोडे, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, स्विय्य सहाय्यक बंडू पाटील आष्टीकर, माजी जी.पं.सदस्य समद खान, रामभाऊ ठाकरे, शंकर पाटील, मदन पाटील, डॉ.गणेश कदम, राम राठोड, बाळू चवरे, संजय काईतवाड, यांच्यासह शिवसैनिक, नागरिक, पत्रकार उपस्थित होते. 

शिवसेनाच हिमायतनगर शहराचा विकास - महाविरचंद 
--------------------------- 
हिमायतनगर शहराला तालुक्याचा दर्जा शिवसेनेचे आमदार असताना मिळाला. आता नगरपंचायत सुद्धा शिवसेनेच्या आमदाराच्या कार्यकाळात झाली आहे. त्यामुळे हिमायतनगर शहर विकासाचे गदा हा शिवसेनेमुळे पुढे रेटत आहे. असे मत परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी व्यक्त केले. 

नगरपंचायतीसाठी आष्टीकरांचे परिश्रम फळाला - समद खान 
----------------------- 

हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा प्रस्ताव अगोदर पाठविला हे खरे आहे. परंतु दर्जा मिळवून देण्यासाठी तत्कालीन पुढारी अपयशी ठरले. ग्रामपंचायतीची निवडणूक लागली, आणि मी स्वतः विद्यमान आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्यासोबत मुंबईला गेलो. माझ्या समक्ष मुख्यमंत्र्यासह सर्वांनी त्याने म्हणणे ऐकून हिमायतनगरला नगरपंचायतिचा दर्जा बहाल केला. त्यामुळे आ.नागेश पाटील आष्टीकर यांचे प्रयत्न फळाला आल्याचे मी या डोळ्यांनी पहिले आहे. त्याच प्रमाणे शहरातील नागरिकांना बिसलेरी पाणी मिळवून देण्याबरोबर सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावे, विकास करणार्यांच्या पाठीशी आम्ही आहे. असे मत माजी जी.पं.सदस्य समद खान यांनी व्यक्त केले.

सोमवार, 6 जुलाई 2015

वडगावात आगडोंब....

वडगावात आगडोंब....
१० शेतकर्याचे घरांचे ११ लाखाचे नुकसान 
शेती व गृहउपयोगी साहित्य खाक झाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर...
शाससाने तातडीची मदत देऊन हातभार लावावा...


हिमायतनगर(अनिल मादसवार) अगोदरच निसर्गाच्या लहरीपणाने भिकेला लागलेल्या शेतकऱ्यांच्या घरांना दि.०६ च्या मध्यरात्री अचानक आग लागली. या घटनेत १० शेतकऱ्यांच्या घरादारासह संपूर्ण गृह उपयोगी साहित्य भस्मसात झाले. पावसाभावी शेतातील पिके वाळू लागली...आता काय खावे आणि कुठे राहावे असा हुंदके देऊन प्रश्न उपस्थित केला. आणि उघड्यावर आलेल्या कुटुंबातील माउलीने आगीत जळलेले अन्नधान्य गोळा करणे सुरु केल्याचे विदारक चित्र हिमायतनगर तालुक्यातील मौजे वडगाव ज.येथे पहावयास मिळाले आहे. या आगडोंबात ३ भावकीतील १० अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जवळपास ११ लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे. दैव बलवत्तराने जाग आली म्हणून आमचे व पशु प्राण्यांचे जीव वाचू शकलो अश्या प्रतिक्रिया हताश झालेल्या कुटुंबातील महिलांनी नांदेड न्युज लाईव्हच्या प्रतिनिधीसमोर व्यक्त केल्या.  

गेल्या १५ दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाळा सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात पेरलेल्या पिकांना जागविण्यासाठी बळीराजा पोटाला चिमटा देत कुटुंबासह धडपड करीत आहे. अश्याच चिंतेत असलेल्या तालुक्यातील वडगाव ज.येथील शेतकरी दि.०५ रोजी दिवसभर घाम गाळून देवाकडे पाऊस पडण्याची विनंती करत घरी परतले. सायंकाळी घरी आल्यानंतर भाकरीचा घास मोडून विश्रांती घेतली. अचानक १२ वाजेच्या दरम्यान घरांना आग लागून पेट घेतल्याचे जाणवले. अचानक घडलेल्या घटनेने घरातील सर्व शेतकरी कुटुंबासह उठून बाहेर आले. तर काही शेतकर्यांनी आपले पाळीव पशु - प्राणी वाचविण्यासाठी धडपड चालविली. तर काहींनी घराला लागलेली आग विजाविण्याचा प्रयत केला. परंतु पाणी टंचाई असल्याने शेतकर्यांना शेतातून पाईप लावून पाणी आणावे लागले. दरम्यान सुरु अससेल्या वार्याने येथील १० घरांना आपले लक्ष केले. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केल्याने या आगडोंबाच्या घटनेत कोंबड्या, अन्नधान्य, ग्रह उपयोगी साहित्य, कपडे लत्ते, टीन- पत्रे, जनावरांचे वैरण, खते, शेती उपयोगी साहित्य, नगद रक्कम, मालमत्तेची कागदपत्रे आदी जळून भस्मसात झाले आहे. या घटनेने १० शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर आले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या अचानक घडलेल्या घटनेने शेतकरी कुटुंब पूर्णतः हताश झाले असून, आता काय खावे, कुठे राहावे असा सवाल करत आहेत. आगीच्या घटनेने नुकसानीत कुटुंबियांना शासनाने तातडीने मदतीचा हातभार लावावा अशी मागणी गावकरी व शेतकरी बांधवांनी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच महसुलचे तलाठी श्री पी.जी.माने यांनी घटनास्थळी सकाळी ९ वाजता भेट देवून जळीत घटनेचा पंचनामा पोलीस पाटील बालाजी ताडकुले व गावकरी पंचासमक्ष केला. या घटनेत येथील शेतकरी गंगाधर मारोती माळसोठे - ९० हजार, लक्ष्मण मारोती माळसोठे - ०२ लाख ८५ हजार, हुलाजी सखाराम तुपेकर - ०२ लाख ४६ हजार, आनंदराव सखाराम तुपेकर - ०२ लाख ४० हजार, सखाराम तोलाजी तुपेकर - १४ हजार, मारोती नारायण शिंदे - ७८ हजार, बालाजी राजाराम शिंदे - ४३ हजार, राजाराम नारायण शिंदे - २७ हजार ५००, ग्यानबा पुंजाराम पावडे - १० हजार, रामेश्वर ग्यान्बाराव पावडे ०८ हजार असे एकूण १० शेतकरी कुटुंबाचे १० लाख ४१ हजार ५०० रुपयाचे नुकसान झाले आहे. तसेच पोलिसांच्या वतीने श्री कांबळे यांनी येथे भेट देवून घटनेची माहिती घेतली.   

तालुक्यासाठी अग्निशमन बंबाची आवश्यकता
-----------------------------
हिमायतनगर तालुक्याचे ठिकाण असून, तालुक्यात एकूण ५३ ग्रामपंचायती आहेत. यात एकूण ७८ हून अधिक गावे -वाडी तांडे असून, आजवर अनेक ठिकाणी अचानक व शोर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या बर्याचश्या घटना घडल्या. परंतु येथे अग्निशमन दलाचे बंब  नसल्याने आगीच्या घटनावर मात करणे कठीण झाले आहे. अशी घटना आघाडल्यास किनवट - ६० कि.मी., हदगाव -४५ कि.मी, भोकर ४० कि.मी.दूरवर असल्याने त्यांना पाचारण केल्या नंतर पोचेपर्यंत मोठे नुकसान झाल्याचा अनुभव तालुक्यात मागील काळात घडलेल्या घटनेवरून आला आहे. आज हिमायतनगर येथे अग्निशमन दलाचा बंब असला असता तर तातडीने आगीच्या घटनेवर उपाय होऊन शेतकऱ्यांचे झालेले नुकसान टळले असते अश्या प्रतिक्रिया या घटनास्थळी उमटल्या आहेत.