टेंभूर्णी शोषखड्ड्याचा प्रयोग तेलंगाना राज्यात राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू - पी.रामाराव
नांदेड(अनिल मादसवार)आपले गाव टेंभूर्णी बघून मनाला समाधान वाटले, येथील शोषखड्ड्याचा प्रयोग संपूर्ण तेलंगाना राज्यात सुद्धा राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे प्रतिपादन तेलंगाना राज्याचे उपयुक्त पी.रामाराव यांनी व्यक्त केले. ते दि.०३ मे रोजी हिमायतनगर तालुक्यातील निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त मौजे टेंभूर्णी येथील शोष खड्ड्याच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या गटार मुक्तीचा पैटर्नची पाहणी करण्यासाठी आले असता बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत राज्यातील नऊ जिल्ह्याचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, तसेच नांदेड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, गटविकास अधिकारी विलास गंगावणे यांची उपस्थिती होती.
गेल्या दहा दिवपुर्वी दिल्ही येथे झालेल्या स्वच्छ भारत मिशनच्या बैठकीत श्री काळे यांनी टेंभूर्णी येथील शोष खड्ड्याचा प्रयोग मानवी आरोग्याच्या हितासाठी कसा उपयुक्त आहे. हे पटवून सांगितले होते, याची दाखल घेत तेलंगाना राज्यातील निझामाबाद, आदिलाबाद, वारंगल, करीमनगर, खम्मम, नालगोंडा, रंगरेड्डी, मेहबूब नगर, मेडक या नऊ राज्यातील जवळपास ३० महिला -पुरुषांची टीम रविवारी गटार मुक्तीचा पैटर्न पाहण्यासाठी दाखल झाली होती. गावात पाहणी करताना शोष खड्डे, त्याची बनावट, कुर्हाड बंदी, तंटामुक्ती, हागणदारी मुक्ती, यासह गावात राबविण्यात आलेल्या विविध प्रयोगाची विस्तृत माहिती अभियंता तथा गावचे उपसरपंच प्रल्हाद पाटील टेंभूर्णीकर यांच्या कडून जाणून घेतली. मिळालेली माहिती आणि प्रत्यक्ष राबविण्यात आलेली कामाची स्थिती व गावातील स्वच्छता पाहून तेलंगाना राज्याची टीम भारावून गेली.
पाहणीनंतर चर्चासत्रात गावकर्यांच्या वतीने शाल - पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रल्हाद पाटील यांनी प्रास्ताविकात गावात राबविण्यात आलेल्या योजना कोणत्या परिस्थिती कोणाचेही सहकार्य नसताना कश्या राबविल्या याची सविस्तर माहिती दिली. तसेच दिल्ली येथे स्लाईड शोच्या माध्यमातून टेंभू र्णी गाव दिल्लीपर्यंत पोन्चविणारे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांचा गावकर्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले कि, मी १० दिवपुर्वी दिल्लीला गेलो तेथे टेंभू र्णी शोष खड्ड्याच्या प्रयोगाची माहिती चालचीत्रातून व प्रत्यक्ष कमी खर्चात गावकर्यांच्या आरोग्यासाठी फायदा कसा होतो हे पटवून दिले. आपल्या गावचा हा पैटर्न इतर राज्य तर राबवतीलच मात्र जिल्ह्यातील अनेक गावात या पद्धतीचे कामे सुरु करण्यात आली आहेत. या प्रयोगातून गावातील रोग रे हद्दपार होऊन साथीचे आजारापासून मुक्ती मिळेल. तसेच पाणी पटली वाढून आगामी काळातील संकटावर मात करण्यात मदत मिळणार असल्याचे सांगितले.
मागील अनेक वर्षापासून टेंभूर्णी गावातील सामाजिक कार्याची माहिती नांदेड न्युज लाईव्हच्या माध्यमातून जगभरात पसरविल्या बद्दल नांदेड न्युज लाइव्हचे अभिनंदन केले. यावेळी सुरेश बाबू, श्रीमती पदमाराणी, कृष्णमुर्ती, कुमार स्वामी, श्री राविन्द्रा, सुरेश मोहन, श्री हनुका, श्री नारायणराव, श्रीनिवास, शेखर चंद्रमहूला, सुनिन्दा, एम.मंगा सरपंच, व्यंकटेश सरपंच, मनीष पटेल, के.एल्लरेडी, आदीसह हिमायतनगर तालुक्यातील मान्यवर, ग्रामसेवक, पत्रकार उपस्थित होते.