परमेश्वर यात्रेच्या पशुप्रदर्शनात कांडलीच्या सूर्यवंशी यांची लाल कंधारी जोडी अव्वल
हिमायतनगर(अनिल मादसवार)येथील श्री परमेश्वर यात्रा महोत्सवाला दिवसेदिवस रंग चढु लागला असुन, दि. २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या पशु प्रदर्शनात आकर्षक अश्या बैलजोड्या, संकरीत गाय, गावरान कालवड, लाल कंधारी गोरे व गावरान गाई आदिंसह शेकडो पशुपालकांनी सहभाग नोंदवीला होता. प्रदर्शनात आलेल्या पशुंची पहाणी पर्यवेक्षक पशुवैद्यकीय अधिका-यांनी करुन योग्य अश्या पशुपालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये गावरान बैलजोडीतुन अरविंद भाऊराव सूर्यवंशी यांच्या लाल - कंधारी बैलजोडीस प्रथम क्रमांकाचे पारीतोषीक देण्यात आले. व्दीतीय बक्षीसाचे मानकरी परमेश्वर राजांना तांद्रावाड पावणेकर, तृतीय पारीतोषीक श्री रमेश दिगांबर शिंदे सरसम यांच्या बैलजोडीस देण्यात आला आहे. लाल - कंधार गावरान गो-हयामध्ये प्रथम क्रमांक मुक्तीराम किशनराव देवकते, हसूल ता.कंधार, दुसरा क्रमांक बालाजी मारोती पांडूरणे बचोती, ता.कंधार, तिसरा क्रमांक संग्राम संभाजी मुस्तापुरे माळाकोळी, ता.लोहा यांना देण्यात आले.
गावरान लाल - कंधारी गाईच्या गटात - प्रथम बक्षीस संटी कप्पलवाड पवना, व्दीतीय सचिन संग्राम मुस्तापुरे माळाकोळी, ता.लोहा, तिसरा क्रमांक दत्ता भोजन्ना कोमलवाड सिबदरा या पशुपालकास देण्यात आला. गावरान कालवडीमद्ये - प्रथम क्रमांक विश्वनाथ देवराव भूत्ते उमरज, ता.कंधार, दुसरा क्रमांक रामचंद्र व्यंकटी घुगे, संगमवाडी ता.कंधार, व्यंकटेश रामेश्वर सुर्याकाम्बले रा.मालाकोली, ता.लोहा यांना देण्यात आला. संकरीत गाईच्या स्पर्धेत - प्रथम - गजानन बाबुराव बासेवाड, आन्देगाव , व्दीतीय - शे.रहेमान शे.मिय्या हिमायतनगर, जय्वानाता नारायण वासुदेव सिरंजनी यांना देण्यात आले. तसेच अन्य विशेष पशुंच्या पालकांना पशुंची निगा व ठेवन या अनुसार उपस्थितांकडुन उत्तेजनार्थ बक्षीस मंदिर ट्रस्टच्या वतीने वितरण करण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून पशुवैदयकीय अधिका-यांसह अन्य मान्यवरांचे स्वागत परमेश्वर ट्रस्ट कमेटीच्या वतीने श्रीफळ देऊन करण्यात आले. यावेळी यात्रा कमेटीचे अध्यक्ष श्री लक्ष्मण शक्करगे, उपाध्यक्ष सुभाष शींदे, सचीव संजय माने , भोकरचे पशुवैद्यकीय अधिकारी एस.जी.जिंकलोड, किनवटचे व्ही.शिरसेवाड, हिमायतनगरचे डॉ.व्ही.एन.बीराजदार, हदगावचे डॉ. एस.जी.चव्हाण, डॉ.पंकज लोखंडे, डॉ. माघाडे साहेब, श्री के.जे.बोयवार, गोपाळ कदम, एस.आर.शिंदे आदिंसह ट्रस्ट समीतीचे उपाध्यक्ष श्री महावीरचंद श्रीश्रीमाळ, राजेश्वर चिंतावार, प्रकाश कोमावार, प्रकाश शिंदे, देवीदास मुधोळकर, संभाजी जाधव, आनंता देवकते, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, विजय शिंदे, नारायण करेवाड, ज्ञानेश्वर शिंदे, अवधुतराव बाचकलवाड, विठ्ठलराव चव्हाण, नारायण बास्टेवाड, पांडुरंग चव्हाण, संतोष गाजेवार, मुन्ना जन्नावार, बाळु मारुडवार, तुकाराम मुधोळकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरग गाडगे, सल्लागार प्रकाश जैन, नांदेड न्युज लाईव्हचे संंपादक तथा सचिव अनिल मादसवार, उपाध्यक्ष दत्ता शिराणे, परमेश्वर शिंदे, संघटक कानबा पोपलवार, कोषाध्यक्ष अनिल भोर, दिलीप शिंदे, असद मौलाना, धम्मा मुनेश्वर, माधव यमजलवाड, आदिंसह कंधार, लोहा, हिमायतनगर, हदगाव, आदीसह अनेक तालुक्यातील शेतकरी वांधव व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
कृषी प्रदर्शनात फळ - भाज्यांची आवक
---------------------
श्री परमेश्वर यात्रा महोत्सवात आयोजीत कृषी प्रदर्शनात भोकर, हिमायतनगर, हदगाव येथील बहुतांश शेतक-यांनी वीवीध प्रकारच्या फळ भाज्या आणुन उत्सफुर्तपने सहभाग नांेंदवीला आहे. यात भोपळा,रामफळ, हाळद,गाजर, गोबी, मीरची, मका, संत्रा- मोसंबी, तमाटा, अंब्याच्या कै-या, चिकु, केळी, डाळींब, काकडी, मुळा, सुर्यफुल, कांदा - लसुन, टरबुज, पपई आदी फळभाज्या प्रदर्शनात माडल्या होत्या.या सर्व पीक - फळांची पहाणी करण्यासाठी शेतक-यांनी गर्दी केली होती. या फळ - भाज्याच्या कृषी प्रदर्शनाची मांडणी पंचायत समीतीचे कृषी अधिकारी पुंडलिक माने , अव्दैत देशपांडे यांनी केली होती. परीक्षण मंदिर समीतीच्या लोकांनी करुन प्रथम व्दितीय क्रमांक निवडण्यात येऊन उपस्तीत मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.