महाशीवरात्रीच्या पर्वावर लाखो भावीकांनी घेतले
श्रीचे दर्शन
हिमायतनगर(अनिल मादसवार)वाढोण्याचे जागृत देवस्थान श्री परमेश्वर नवसाला पावनारा म्हणुन संबध जिल्ह्यात ख्यातीप्राप्त आहे. माघ कृ.13 दि.१७ मंगळवारी महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर लाखो भावीकांनी श्रीचे दर्शन जिल्हयासह मराठवाडा-विदर्भ- तेलंगाना, आंध्रप्रदेशातील भक्तांनी घेऊन पुण्य प्राप्त केले आहे. शहरात सर्वत्र भक्तांची मंदियाळी दिसुन आल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पारण्याच्या उपवास धरुन सायंकाळी सुर्यास्तापर्यन्त लाखो भावीक भक्तांनी मध्यरात्री १२ च्या नंतर दर्शनासाठी गर्दी केली होती. भक्तांच्या सुवीधेसाठी मंदिर समीतीने विषेश सुवीधा, चहा- फराळ पाण्याची सोय केली होती.
महाशिवरात्री नीमीत्ताने मंदिराच्या कळसाच्या, मुख्य कमानीवर आकर्षक विद्दुत रोषनाई करण्यात आली. श्री दर्शनासाठी वाडी -तांडे, खेडयापाड्यातुन सहपरीवारासह बैलगाडी, जीप, बस, रेल्वेसह मिळेल त्या वाहनाने भक्तांचे लोंढेच्या - लोंढे दाखल झाले होते. शहरात सवर्त्र भक्तीमय वातावरण निमार्ण झाले असुन, महाशिवरात्रीचे औचीत्य साधुन मंदिर परीसरात बील्वपत्रे, मीठाई, फराळाचे साहीत्य तर मुख्य रस्त्यावर फळे- फुलंासह विवीध वस्तु - पदार्थाची सजलेली दुकाने व भक्तांच्या अफाट गर्दीमुळे यात्रेला रंग चढु लागल्याने चित्र दिसुन आहेे. महाशीवरात्रीच्या दिवशी दिवसातुन 3 वेळा श्री चे दर्शन घेण्याची प्रथा परंपरेनुसार चालत आली असुन, सकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही वेळा श्री परमेश्वराचे सगुनरुपी दर्शन वेगवेगळ्या रुपात होते, असे जुने जानकार सांगतात.
महाशिवरात्रीच्या दिवशी तालुक्याचे आमदार नागेश पाटील आष्टीकर आणि माजी आ. माधवराव पाटील जवळगांवकर यांनी उपस्थीत होऊन, श्रीचे दर्शन घेतले. दुपारी शीवलीलामृत ग्रंथाचे वाचन व रात्री 8.30 वाजता हभप.जालंधर महाराज यांच्या कितर्नाचा कार्यक्रम संपन्न होताच शिवापती मंदिरातील शिव - पावर्तीचा अभीषेक सोहळा मध्यरात्री 01 ते 3 च्या दरम्याण संपन्न झाला. मंदिर संस्थानचे पदसीध्द अद्यक्षांच्या हस्ते पुरोहीत कांतागुरु वाळके यांच्यासह पाच ब्राम्हण गुरुंच्या वेदशास्त्रींय मंत्रोच्चाराच्या जयघोषात अभीषेक व महापुजा संपन्न झाली. श्रीच्या मुर्तीला अलंकार विभुषीत केल्यानंतर दहीहांडी गोपाल काल्यापर्यंन्त ठेवन्यात येतो. यावेळी अलंकार विभुशीत श्री परमेश्वराची मुर्ती पाहुन भावीक भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटतात. वतनदारांच्या पुजेनंतर मध्यरात्री उशीरा श्रीच्या मुर्तीला सोने, चांदीचा अलंकार, टोप, चंद्रहार, दोन, तीन व पाच पदरी हार, कर्णकुंडल, आदींसह अन्य आभुषने मंदिराचे विश्वस्त संचालक मंडळींंच्या उपस्थीतीत चढवीण्यात आली आहेत. यावेळी मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष तहसिलदार हिमायतनगर ,उपाध्यक्ष महावीसेठ श्रीश्रीमाळ, सचिव राजेश्वर चिंतावार,सदस्य लक्ष्मणराव शक्करगे, किशनराव मादसवार, भास्कर दुसे, देवीदास मुधोळकर, शाम पवनेकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, संभाजी जाधव, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, आनंता देवकते, मुलचंद पिंचा,राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर व लिपीक बाबुरावजी भोयर, गावकरी मंडळी उपस्थीत होते.
शिवरात्रीच्या दुस-या दिवशी परंपरेनुसार शहरातील भक्तगण व मानकरी भक्तंाकडुन बँड - बाज्याच्या गजरात मिरवणुक काढुन भगवे झंडे लावले जाऊन पुजा- अचर्ना करण्यात येऊन श्री परमेश्वरच्या चरणी दाळ -भात, पुरण-पोळी व गुळाचे नैवेद्य दाखऊन पारण्याचा उपवास सोडला. हा अदभुत व भक्तीमय सोहळयाचा संगम पाहण्यासाठी तालुक्यासह विदर्भ,मराठवाडा, कर्नाटक , आंध्रप्रदेशासह राज्यातील कानाकोप-यातुन भावीक भक्तांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती. दरम्यान मंदिर दशर्नसाठी आलेले भावीक व अंलकारमय श्री मुर्तीच्या संरक्षणासाठी पोलीस अधिक्षक परमजितिसंह दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी यांनी मंदिर परीसरात बंदुकधारी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे.
शिवरात्रीच्या पावन पर्वानीमीत्ताने हदगांव- हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी श्रीचे दर्शन घेतले, यावेळी त्यांच्या हस्ते शहर व परीसराच्या सिमेंटीकरणाच्या रस्त्याचे भूमिपूजन केल्या गेले. यावेळी मंदिरात उपस्थित भावीक-भक्त व नागरीकांना संबोधीत करतांना ते म्हणले की जनतेच्या आर्शीवादानेच विकास कामाचा धडका सुरु असुन, अश्याच प्रकारे जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील्यास हिमायतनगर तालुक्यातील तमाम देवी - देवतांच्या मंदिराबरोबर गाव- वाडी- तांडे- शहराचा कायापालट करण्याठी सदैव प्रयत्नशील राहील. तसेच गुत्तेदारानेही विकास कामात पारदर्शकता ठेऊनच कमे करावी अन्यथा त्याची गय केली जाणार नसल्याचे सांगून कामाचा दर्जा वाढवीण्याच्या सुचना दिल्या.
महाशिवरात्रीच्या पावण पर्वावर परमेश्वर मंदिर परिसर भक्तांच्या गर्दी व बेल, फुल, प्रसादाच्या स्टोलने परिसर फुलाला, मंदिर समितीच्या वतीने भक्तांसाठी फराळ, चहा, पाण्याची सोय करण्यात आली. यावेळी भाविकांनी रांगा लावून मनोभावे दर्शन घेवून डोळ्याचे पारणे फेडले.