बोस यांची जयंती

हिमायतनगर(वार्ताहर)देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर महात्म्यांनी बलिदान दिले. तर व शिवार्याच्या राज्यात खांद्याला खांदा लावून मुस्लिम समाजाच्या मावळ्यांनी बलिदान दिले असे मत संभाजी ब्रिगेडची मुलुख मैदानी तोफ अमोलदादा मिटकरी यांनी व्यक्त केले.

ते हिमायतनगर येथे आयोजित महान क्रांतिकारक आजाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाष चंद्र बोस व शहाजी राजे भोसले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या मंचावरून बोलत होते. यावेळी मंचावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ते, गजानन जाधव, विजय नरवाडे, रामभाऊ ठाकरे, बालाजी राठोड, शिवाजी जाधव, जेष्ठ पत्रकार प्रकाश जैन, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुभाष चंद्र बोस व शहाजी राजे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांचा सत्कार संपन्न झाल्यानंतर पुढे बोलताना ते म्हणाले कि, हिंदू - मुस्लिम समाज हे शत्रू नसून, एकमेकांचे बांधव आहेत. इतिसाच्या काळात अनेक मुस्लिम बांधवांनी जीवाची पर्वा न करता प्राणाची बाजी लावली त्यात सर्वात पहिला सैनिक हे मुसलमान होते. मुस्लिम बांधवाना शिवाजी महाराजांनी हिंदू बांधावासमान वागणूक दिली. हे जाणून घ्यायचे असेल तर सर्वांनी शिवरायांचा इतिहास समजून घ्यायला हवा तरच बहुजनांचा विकास होईल. मार्गदर्शना दरम्यान अनेक उदाहरणे देवून अण्णाभाऊ साठे, संत तुकाराम, संत गाडगे बाबा यांच्या आठवणीना उजाळा देवून युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देश जगाच्या नाक्शावर आहे, या महाराष्ट्राला क्रांतिकारकांचा इतिहास आहे, इतिहास जाणून घ्यायचा असले तर पुस्तकाचे वाचन करून सर्व सामान्यांनी इतिहासातील सत्यता जाणून घ्यावी. १८ पगड जातीच्या समाज बांधवांनी एकत्र येउन शिक्षण घ्यावे, शेतकर्यांनी खचून आत्महत्या न करता परिस्थितीशी सामना करावा असे आवाहनही त्यांनी केले. सध्या पुरुषाच्या संखेत स्त्रियांची संख्या कमी आहे, स्त्री असेल तरच क्रांतीकार जन्माला येतील त्यासाठी स्त्रीभ्रन हत्या टाळून आपल्या हातून होणारे पहापाप टाळावे असे आवाहन केले.

परकीय शत्रूच्या तावडीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी " तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दुंगा " असा नारा देत आजाद हिंद सेनेची स्थापना करून आपल्या प्राणाची आहुती देवून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ज्या ज्या वेळी अन्याय अत्याचार वाढला त्यावेळी अश्या महान पुरुषांनी जन्म घेतला. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिकविले जाणारे अभ्यासक्रम केवळ माहितीचा खजिना आहे. परंतु यातून स्फूर्ती मिळत नाही, त्यासाठी अखिल भारतीय मुस्लिम सेना या सामाजिक संघटनेच्या शे.इस्माईल यांनी आयोजित केलेली क्रांतीकारकाची हि जयंती स्फूर्ती व ताकद देणारी ठरली आहे.

आजच्या काळात नव्या पिढीला नवा इतिहास मिळत आहे, परंतु नवा इतिहास न देता पिढीजात जुन्या क्रांती कारकांचा इतिहास देणे गरजेचे आहे. तरच आगामी काळात अश्या क्रांतीकाराचा जन्म होईल असेही ते म्हणाले. यावेळी प्रवीण कोमावार, शुद्धोधन हनवते, जांबुवंत मिराशे, वसंत राठोड, विलास वानखेडे, मारोती हेंद्रे, उदय देशपांडे, गजानन हरडपकर, गजानन वानखेडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार गणेश राउत यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी