धनादेशाचे वाटप

पार्डी येथील शौचालय बांधकाम केलेल्‍या लाभार्थ्‍यांना धनादेशाचे वाटप

नांदेड(प्रतिनिधी) लोहा तालुक्‍यातील पार्डी येथील शौचालय बांधकाम केलेल्‍या 26 लाभार्थ्‍यांना 26 जानेवारी रोजी धनादेशाचे वाटप करण्‍यात आले.

ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्‍यमान उंचाविण्‍यासाठी शौचालय बांधकाम केलेल्‍या लाभार्थ्‍यांना बरा हजार रुपयाचे प्रोत्‍सहानपर बक्षीस देण्‍यात येते. 26 जानेवारीचे औचित्‍य साधून पार्डी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. प्रणिताताई देवरे यांच्‍या अध्‍यक्षतेखली झालेल्‍या कार्यक्रमात लोहा पंचायत समितीच्‍या सभापती सोनालीताई ढगे, जिल्‍हा परिषद सदस्‍य श्रीनिवास मोरे, लोहा पंचायत समितीचे उपसभापती रोहित पाटील, गट विकास अधिकारी रंगवाळ, पंचायत समितीचे सदस्‍य डॉ. संभाजी गवळी, नवनाथ शेळके, सरपंच सुलोचनाबाई धडेकर, उपसरपंच दिगांबर डिगळे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्‍यवहारे, स्‍वच्‍छता तज्ञ विशाल कदम, मिनी बिडीओ डी.आय.गायकवाड, टी.टी. गुट्टे, डी.पी. धर्मेकर, कैलास मोरे, दिलीप मोरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करतांना प्रणिताताई देवरे म्‍हणाल्‍या की, गावात स्‍वच्‍छता ठेवण्‍यासाठी शौचालयाची आवश्‍यकता आहे. आपण आपल्‍या कुटूंबासाठी बांधलेल्‍या शौचालयाला शासनाच्‍यावतीने बारा हजार रुपये मिळतात, याचा गावक-यांनी लाभ घ्‍यावा असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले. जिल्‍हा परिषद सदस्‍य श्रीनिवास मोरे यांचेही यावेळी भाषण झाले. स्‍वच्‍छतेचा आरोग्‍याशी संबंध असून आजाराचे प्रमाण कमी करण्‍यासाठी शौचालय बांधणे आवश्‍यक असल्‍याचे ते म्‍हणाले.

प्रत्‍येकी बारा हजार रुपयाप्रमाणे 26 लाभार्थ्‍यांना 3 लाख 12 हजार रुपयाच्‍या धनादेशाचे मान्‍यवरांचे हस्‍ते वितरण करण्‍यात आले. याप्रंसगी सभापती सोनालीताई ढगे, उप सभापती रोहित पाटील यांनी गावक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक दिगांबर डिकळे यांनी केले. सुत्रसंचालन सखाराम धडेकर यांनी तर उपस्थितांचे आभार मारोती पवार यांनी मानले. या कार्यक्रमाला राजू डिकळे, बालाजी पाटील, विश्‍वनाथ वाघमारे, ग्रामसेविका विजना क-हाळे यांच्‍यासह गावातील प्रतिष्‍ठीत व्‍यक्‍ती, अंगवाडी कार्यकर्ती, महिला व गावकरी यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी