प्रास्ताविकेचे वाचन

अंनिसच्या वतीने संविधान प्रास्ताविकेचे वाचन 
नांदेड(प्रतिनिधी)महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर दि.२६ जानेवारी ते ३१जानेवारी पर्यंत संविधानबांधीलकी महोत्सव अभियान साजरा होत आहे.त्याचाच एक भाग म्हणून नांदेड अंनिसच्या वतीने २६ जानेवारी रोजी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी संपन्न झालेल्या या वाचनात डॉ.हंसराज वैध,डॉ.किरण चिद्रावार, प्रा.लक्ष्मण शिंदे,इंजि.सम्राट हटकर,कुलदीप नंदूरकर,प्रा.इंगोले,प्रकाश पाईकराव,अजिंक्य घोंगडे यांच्या सह आदि उपस्थित होते.

अंनिसच्या अध्यक्षपदी डॉ.हंसराज वैध तर 
कार्याध्यक्षपदी भारतीताई सदावर्ते.

नांदेड अंधश्रध्दा निर्मूल समिती नांदेड तालुका शाखा कार्यकारिणीची बैठक नुकतीच जिल्हाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीत नांदेड तालुका शाखेच्या अध्यक्षपदी डॉ.हंसराज वैध तर कार्याध्यक्षपदी भारतीताई सदावर्ते यांची सर्वानुमते निवड झाली.. उर्वरित कार्यकारिणी अशी -उपाध्यक्ष - गोवर्धन डोईफोडे, डॉ.किरण चिद्रावार,प्रधान सचिव - कुलदीप नंदूरकर,डॉ.पुष्पा कोकीळ. बुवाबाजी संघर्ष कार्यवाह - गया कोकरे,उत्तम गायकवाड, कायदेविषयक सल्लागार - ऍड.रविंद्र रगटे,ऍड.प्रशात कोकरे. वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प कार्यवाह - व्ही.एस.हुलसरे,आत्माराम राजेगोरे, वार्तापत्र कार्यवाह -साईनाथ कोद्रे,श्रीकांत दाचावार. सांस्कृतिक विभाग - खान महेमूद,रविकुमार आळणे. प्रकाशने वितरण कार्यवाह - डॉ.अंकीत मांजरमकर,व्यंकटेश बुलबुले. युवा सहभाग कार्यवाह - डॉ.विवेकानंद टापरे. महिला सहभाग कार्यवाह - डॉ.शीतल वैध,लता शिंदे. शिबीर कार्यवाह - प्रकाश पाईकराव. निधी संकलन कार्यवाह -व्हा.मालती अशी निवड करण्यात आली.सदरील कार्यकारणीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.लक्ष्मण शिंदे. इंजि.सम्राट हाटकर, इंजि.रंजना खटके यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी