तपासणी अहवालात दोषी कोण..

हिमायतनगर(वार्ताहर)येथील तहसील कार्यालयाची गेल्या महिन्यात उपविभागीय अधिकारी दीपक घाडगे यांनी तपासणी केली असून, अनेक कर्मचारी व अधिकारी दोषी आढळल्याचे समजले असून, या बाबतची अधिकृत माहिती देण्यास तहसीलदार यांनी टाळले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या महिन्यात हिमायतनगर तहसील कार्यालयाची तपासणी उपविभागीय अधिकारी श्री दीपक घाडगे यांनी केली. त्यांच्या तपासणी दरम्यान अनेक कार्यालयीन कामात अनियमितता दिसून आल्याचे सांगण्यात येत असून, दोषी कर्मचारी यांना उपविभागीय अधिकारी यांनी नोटीसा दिल्या आहेत. तसेच महसुल वसुलीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याची चर्चा कार्यालईन कर्मचार्यात दबक्या आवाजात सुरू असून, यात गौण खनिज, अभिलेखे, इत्यादी कागद पत्रामधून वसूल करण्यात आला आहे. परंतु जमा झालेला महसुल केवळ तीन अंकी संखेत दाखविण्यात आल्याने महसूल वसूल करून टाकला कुठे ..? असा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी लक्ष देवून येथील कार्यालईन कामकाजाची तपासणी केल्यास महसुल, राशन कार्ड वितरण, गौण खनिज परवाना, कृषक जमिनीचे एन.ए., यासह तलाठ्याकडून करण्यात आलेल्या फेरफार प्रकरणातील गैरप्रकार उघडकीस येईल अशी रास्त अपेक्षा नागरीकातून व्यक्त होत आहे.

कार्यालईन तपासणी बाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी तहसीलदार शरद झाडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करत उपविभागीय अधिकारी दीपक घाडगे यांच्याकडे अंगुली निर्देश करीत माहिती त्यांनाच विचार असे सांगून तोंडावर बोट ठेवले आहे. त्यामुळे येथील कामकाजात तहसीलदार यांना रस नसल्याचे यावरून दिसून येत आहे.

या बाबत अधिक माहितीसाठी उपविभागीय अधिकारी श्री घाडगे यांच्याशी संपर्क केला असता मी जिल्हाधिकारी यांच्या मिटिंग मध्ये आहे. पुन्हा फोन करा असे सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी