ग्राहक सेवा केंद्राने बायको बदलली



हिमायतनगर(वार्ताहर)शहरतील भरतीत स्टेट बैन्केच्या अधिकार्यांनी गल्थांपानाचा कळस गाठला असून, प्रधानमंत्री जंधान योजनेचे खाते काढणाऱ्या ग्राहकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. खाते काढण्यासाठी बैन्केचे अधिकारी पाठवीत असलेल्या ग्राहक सेवा केंद्रात लुट होत असून, आज तर चक्क एकाच्या खात्यावर दुसर्याचा फोटो लावल्याने सिएसपीच्या संचालकाने बायको बदलल्याची तक्रार खातेदार महिलेच्या पतीने बैंक अधिकार्याकडे केली असता, तिथेही अपमानास्पद वागणूक मिळल्याचा आरोप केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर येथील एका दुकानात मजुरी करून पोट भरणाऱ्या संतोष तालेवार याने पत्नीच्या नावे शुन्य खर्चावर जनधन योजनेचे खाते काढण्यासाठी मागील महिन्यात भरीत स्टेट बैंक गाठली होती. त्या ठिकाणी असलेल्या अधिकारी श्री होडे यांनी खाते काढण्यास टाळाटाळ करीत थेट ग्राहक सेवा केंद्र(सी.एस.पी)शाकेत पाठविले. या ठिकाणी खाते काढण्यासाठी आले असता सर्व कागद पत्राची पूर्तता करूनही १०० रुपये घेतले. त्यानंतर दिलेल्या वेळेनुसार खाते पुस्तिका मागणीसाठी गेले असता आज या उद्या या असे करत महिना लोटला. कसे बसे खाते पुस्तक मिळाले, परंतु पाहताच काय चक्क सिएसपीच्या संचालकाने तक्रार कर्त्याच्या पत्नीच्या खात्यावर अन्य ५० वर्षीय महिलेचा फोटो लावून बायको बदलली. या प्रकाराने संतोष आश्चर्य चकित झाला, त्याने संबंधित संचालकास विचारणा केली असता, सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांनतर तुझ्याने जे होते ते करून घे.. बैन्केसमोर गोंधळ करू नको अशी अपमानास्पद भाषा वापरली. त्यामुळे सदर युवकाने सरळ भारतीय स्टेट बैंक शाखा गाठून हा प्रकार अधिकार्याकडे कथन केला. परंतु मंगळवारी सदर अधिकार्यांनी पुन्हा या बघुत असे सांगून घरी पाठविले. दुसर्या दिवशी बुधवारी पुन्हा शाखा गाठून खात्यासंबंधी विचारणा केली यावेळी खाते पुस्तिकेचे काम पाहणारे श्री होडे यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यावर तक्रार कर्त्या युवकाने तुम्ही माजी बायकोच बदलून टाकली आहे..असे म्हणताच अधिकार्याने काय फरक पडला असे प्रतिउत्तर दिल्याने संतोषने रागात येवून याची माहिती पत्रकारान देतो असे म्हणताच तातडीने नवीन खाते उघडून देण्यात आले. परंतु एकाच्या खात्यावर दुर्याच्या पत्नीचा फोटो टाकणाऱ्या त्या ग्राहक सेवा केंद्र चालकावर काहीच कार्यवाही केली नसल्याचा आरोप संतोष तालेवार याने पत्रकारांशी बोलताना केला.

एरवी खाते काढण्यासाठी एसबीआय शेखेत गेले असता येथे खाते काढले जात नाही असे सांगून ग्राहक सेवा केंद्रात पाठविणाऱ्या अधिकारी श्री होडे यांच्याकडे सिएसपी ने बायको बदलल्याची तक्रार करताच अवघ्या तास भारत संतोषच्या पत्नीचे दुसरे खाते पुस्तक काढून दिल्याने जंधान योजनेप्रती बैंक अधिकारी किती दक्षता घेवून ग्राहकांना पारेषण करतात याचा प्रत्यय आला आहे. अश्या अनेक तक्रारी दररोज होत असताना द्केहील ग्राहकांची लुट करणाऱ्या सिएसपी शाखेच्या मनमानी कारभाराकडे अधिकारी दुर्लक्ष का करतात..? असा सवाल नागरिक विचारीत आहेत. या प्रकाराकडे भारतीय स्टेट बैन्केच्या जिल्हा प्रबंधक व वरिष्ठांनी लक्ष देवून येथे चालू असलेल्या मनमानी कारभाराकडे लक्ष देवून ग्राहकांना सुरळीत सेवा द्यावी अशी मागणीही जोर धरत आहे.

या बाबत शाखाधिकारी जैन यांच्याशी संपर्क साधला असता असा काही प्रकार घडला नाही असे सांगून हात वर करून ग्राहक सेवा केंद्राच्या संचालकास अभय देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी