सिंग यांचे आगमन

मुखेड पोटनिवडणुकीचे निरीक्षक सिंग यांचे आगमन


नांदेड(प्रतिनिधी)मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्‍त निवडणूक निरिक्षक आर. के. दिनेश सिंग यांचे आगमन झाले आहे, अशी माहिती जिल्‍हा निवडणूक कार्यालयाकडून देण्‍यात आली आहे.

91-मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्‍यासाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक निरिक्षक म्‍हणून आर. के. दिनेश सिंग यांची नियुक्‍ती केली आहे. श्री. सिंग हे मणिपूर राज्‍याच्‍या क्रीडा व नगरविकास विभागाचे सचिव आहेत. श्री. सिंग हे भारतीय प्रशासकीय सेवा सन 2000 च्‍या बॅचचे अधिकारी आहेत.  ते मुखेड पोटनिवडणुकीसाठी निरिक्षक म्‍हणून संबंधित मतदार संघातील निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवतील. या मतदारसंघाचा दौराही ते करतील. त्‍यांचा मोबाईल क्र. 9404104900 असून ईमेल आयडी gobserver91@gmail.com  असा आहे. ते शासकीय विश्रामगृह मिनी सह्याद्री कक्ष क्र. 1 येथे दररोज सकाळी 9 ते 10 या वेळेत भेटीसाठी उपलब्‍ध असल्‍याचेही जिल्‍हा निवडणूक कार्यालयाने कळवले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी