वटगणेश


हिमायतनगर(वार्ताहर)भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणेश म्हणुन येथील वडाच्या झाडाखाली अनादिकालापासून वसलेल्या श्री वट गणेशाला पहिला मान आहे. दर महिन्याच्या गणेश, अनंत, अंगारिका चतुर्थी, दर सोमवारी, व गणेशोत्सव काळात हजारो भाकत श्री वट गणेशाचे आवर्जून दर्शन घेतात. म्हणून गणेशोत्सवात वट गणेशाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरासमोरील वाजाच्या झाडाखालील ओट्यावर हजारो वर्षाखालील शालिवाहन शकेच्या काळातील पुरातन कालीन श्री गणेशाची मूर्ती आहे. या ठिकाणी एक मोठी व एक लहान अश्या दोन मुर्त्या असून, यास वाट गणेश नावाने ओळखले जाते. या ठिकाणी वाट पौर्णिमेच्या दिवशी हजारो महिला एकत्र जमून वडाची व या वट गणेशची पूजा - अर्चना करून पतीच्या दिर्घयुशाची कामना करतात. प्रथम पूजनीय श्री गणेशची मूर्ती या विशाल व शेकडो वर्ष जुन्या वडाच्या झाडाखाली खुल्या स्थित हि मूर्ती स्थापन केलेली आहे. दर सोमवारी शहरातील गणेशभक्त या वट गणेशाचे दर्शन घेऊन पुण्यप्राप्त करतात. वडाचे झाड हे ऋषी वृक्ष असल्या कारणाने वाट गणेशासमोर गुळ, मीठ व फुटणे असा प्रसाद ठेवला जातो. दुखी असलेले पिडीत दुख निवारणासाठी मनोकामना करून पाच सोमवार उपवास धरतात. सोवारी दर्शन घेऊन ११ प्रदक्षिणा घालणार्य भक्तांचे दुख दूर होते असा अनुभव जुने जाणकार सांगतात. या श्रद्धेपोटी दिवसेंदिवस भक्तांची गर्दी दर्शनासाठी वाढतच आहे. गणेशची मूर्ती अत्यंत आकर्षक व सुंदर असून, त्यामुळे या गणेश दर्शनाला प्रथम मान आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी