जेलमध्ये टाकण्याची धमकी

हिमायतनगर(अनिल मादसवार)मौजे आन्देगाव मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार वाढल्यामुळे विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप गावकर्यांनी करून तातडीने बदली करण्याची मागणी केली होती. यावरून चौकशीसाठी आलेल्या दोन शिक्षणविस्तार अधिकाऱ्या समक्ष सदर मुख्याध्यापकाने उपस्थित पालक व गावकर्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन सह महिने जमानत होऊ देणार नाही असे वक्तव्य केल्याने पुन्हा मुख्याध्यापक वादाच्या भोवयात आला आहे. तातडीने यांची बदली करा अन्यथा पालक व गावकरी तीव्र आंदोलन करून बुधवारी शाळेला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

चालू शैक्षणिक वर्षात जी.प.शाळांचा शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असून, विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी शिक्षकच नाहीत तर असलेल्या ठिकाणी शिक्षक शाळेवर येत नाहीत किंवा शिकवत नाहित असे विदारक चित्र हिमायतनगर तालुक्यातील मौजे आन्देगाव येथील जी.प.शाळेत निर्माण झाले आहे. येथे अगोदरच वर्ग चार व शिक्षक दोन अशी अवस्था असून, शिक्षकांची दोन रिक्त पदे असताना आळीपाळीने शाळा करण्याचा नियम मुख्याध्यापक बळीराम वानखेडे यांनी स्वतःच बनविला आहे. कधी सहकारी तर कधी मुख्याध्यापक असा शालेय परिपाठ चालू असल्याने येथील जवळपास निम्म्याहून अधिक विद्यार्थी संख्या घटली आहे. असा प्रकार चालू असल्यामुळे मुख्याध्यापकाची व सहकार्याची तातडीने बदली करून कर्तव्य दक्ष शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे केली होती. या बाबतचे वृत्त प्रकाशित होतच गटशिक्षण अधिकारी सुराजुसे यांच्या मार्गदर्शनाने दि. ०८ मंगळवारी शिक्षण विस्तार अधिकारी आर.व्ही.संगपवाड, आर.बी. पवार, आणि केंद्र प्रमुख एस.एस.भिसे यांनी मुख्यध्यापक व शिक्षकांच्या चौकशीसाठी शाळेला भेट दिली होती. यावेळी गावकरी व शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्या समक्ष येथील मुलांच्या शिक्षणिक गुणवत्ते बाबत विचारण सुरु केली.

कार्यवाहीच्या धास्तीने पित्त खवलेल्या मुख्याध्यापक श्री वानखेडे यांनी कार्यवाहीत खोड निर्माण करण्याच्या उद्देशाने अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावकर्यांना अरेरेरावीची भाषा वापरीत अश्या तक्रारी तुम्ही देत राहिला तर तुम्हाला जेल मध्ये टाकून सहा महिने जमानत होऊ देणार नाही, मी दहा वर्षापासून शाळेवर कार्यरत आहे, माझी पोहोंच वर पर्यंत हाय. तसेच माझ्या जवळ वन - फोर्थ चे प्रमाण पत्र आहे. त्यामुळे माझे कोणीही काहीच वाकडे करू शकणार नाही.. असा आव आणून चौकशीला आलेल्यांसह शाळा व्यवस्थापन समिती व गावकर्यांचा अपमान केला आहे. असे निवेदन सादर करून तात्काळ वानखेडे नामक मुख्याध्यापकाची बदली करा. आणि दुसरा चांगला व कर्तव्यदक्ष शिक्षक द्यावा अन्यथा उद्या दि.१० रोजी शाळेला कुलूप लावण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र भुतनर, उत्तम राउत, लक्ष्मण जीठेवाड, कैलास बासेवाड, गोविंद यलकेवाड, परमेश्वर नीळकंठे, वामन गवारे, पांडुरंग पोलसवार, संतोष आहेरकर, संतोष हाटेकर, बाबू नीळकंठे, देवन्ना बासेवाड, बालाजी आलेवाड, साईनाथ देशमवाड, प्रदीप भुतनर, हनुमंत बक्केवाड, बालाजी भुसावळे, शे.सत्तर, संजय कालेवाड, अशोक मुतनेपाड आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

विशेष म्हणजे याच सरसम गटातील जी.पं.सदस्य सुभाष राठोड हे आहेत. आणि ते जिल्हा शिक्षण समितीचा सदस्य सुद्धा आहेत. परंतु त्यांच्याच गटातील शाळांची अशी अवस्था आहे. याबाबत त्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे गावातील नागरिकांनी शिक्षकांच्या मागणीसाठी १० तारेखेची डेडलाईन दिली होती. त्यामुळे एक दिवसापूर्वी शाळेची समस्या सोद्विण्यासाठी आलेल्या अधिकार्यासमक्ष मुख्याध्यापकाने अशी भाषा वापरल्याने गावाकार्यात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत गटशिक्षण अधिकारी सुरजुसे यांच्याशी संपर्क साधला असता रिक्त पदाचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. तालुक्यात ९२ शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत, गावकर्यांच्या मागणीप्रमाणे तो वादग्रस्त मुख्याध्यापक उद्यापासून आन्देगावच्या शाळेवर जाणार नाही. मात्र जोपर्यंत जी.प. स्तरावरून नवीन शिक्षक येणार नाही तोपर्यंत एकच शिक्षक शाळा चालविणार आहे.

शिक्षण विभागाचे आश्वासा हवेत...विद्यार्थ्यांचे बेहाल

मागील आठवड्यात मुख्य कार्यकारी अभिमन्यु काळे यांची आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या शिष्ठमंडळाने भेट देऊन शिक्षकांची मागणी केली होती. तेंव्हा दि.०७ जुलै २०१४ पर्यंत शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्याचे आश्वासन दिले होते. आठ दिवसाचा कालावधी लोटून आज ०८ तारीख उजाडली असताना देखील एकही शिक्षक हिमायतनगर तालुक्यात आला नाही. त्यामुळे तालुक्यातील जी.प.शाळांमधील शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील दिघी, पवना, वारंगटाकळी, वडगाव ज., सिबदरा, आन्देगाव यासह अन्य शाळांमध्ये शिक्षक अभावी विद्यार्थ्यांचे बेहाल होत आहेत. त्यामुळे जिल्हा शिक्षण विभागाचे आमदारांना दिलेले आश्वासन हवेत विरले कि काय..? असा सवाल शिक्षण प्रेमी नागरिक विचारीत आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी