आषाढीच्या मुहूर्तावर विठ्ठल पावला...

जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी... 
आषाढीच्या मुहूर्तावर विठ्ठल पावला...


नांदेड(अनिल मादसवार) आजच्या मुहूर्तावर राज्यावरील दुष्काळाचंसंकट दूर कर.. अश्या शब्दात  विठ्ठल-रखुमाईला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनि विठ्ठलाला साकडे घातले असून, मागील महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर भक्तांच्या हाकेला धाऊन येउन मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे आषाढीच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल पावला अशी प्रतिक्रिया पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यामधून ऐकावयास मिळत आहे.

दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याची सुरुवात मृग नक्षत्राला रिमझिम पावसाने झाली, मात्र तेंव्हापासून आभाळात ढगांचा लपंडाव सुरु करून वरुणराजा  बळीराजा.शेतमजूर व सामन्यांशी  खेळ खेळत असल्याचा अनुभव सर्वाना येत होता . जिल्ह्यातील काही भागात अधून मधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या मात्र वातावरणातील उकाडा काही गेला नव्हता. त्यामुळे उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात उन्हाचा पारा ४० अंशाच्या वर गेला होता. पाऊस पडावा यासाठी  जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ठीक -ठिकाणी व ग्रामीण भागात जो तो वरुण  राज्याला साकडे घालीत अन्नदान, पायी  दिंडी काढून , देवी देवतांना साकडे, घालत होता कुठे धोंडीचा नारा, घाट मांडून बेडकाची पूजा, जलाभिषेक, भजन,-कीर्तन व जमेल त्या पद्धतीने पावसासाठी परमेश्वराची आळवणी सुरु होती. तर राजकीय नेत्यांनी सुद्धा या संधीचा फायदा घेतला असून, आगामी काळातील निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन का होईना आषाढीच्या निमित्ताने विठ्ठलाला साकडे घालून वरून राजाला प्रसन्न करण्याच्या प्रयत्न केल्याचे फेसबुक, व्हाट्स -अप, ट्वीटर, टेलिग्राम आदी सोशियल मिडीया व वर्तमान पत्रातून दिसून आले आहे.

अखेर ऐन आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कुठे कमी - अधिक प्रमाणात पाऊस होत असून, यामुळे विठ्ठलच पावला अशी आपसूकच प्रतिक्रिया भाविकांच्या तोंडून बाहेर पडते आहे. यापावासाने थोडका होईना हवालदिल झालेल्या शेतकरी व नागरिकाना दिलास मिळाला असून, महिन्यापासून गायब झालेला पाऊस पडल्यामुळे शेतकरी व सामन्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र रखडलेल्या पेरण्यांची सुरुवात करण्यासाठी आणखीन मोठा पाऊस आवश्यक असल्याचे मत काही शेतकर्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना व्यक्त केले आहे. कारण लगेच पेरण्या केल्या तर पुन्हा अश्याच प्रकारे पाऊस गायब झाला तर शेतकर्यांनी काय करायचे..? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी