वृद्धाचा मृत्यू..


हिमायतनगर(अनिल मादसवार)रेल्वे प्लैटफॉर्मची उंची कमी आणि रुंदी अधिक असल्याकारणाने रेल्वेतून उतरणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा कृष्णा एक्स्प्रेस रेल्वे खाली कटून मृत्यू झाल्याची घटना दि.१७ मंगळवारी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास हिमायतनगर रेल्वे स्थानकावर घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रवाश्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, याकडे रेल्वे विभागाने जातीने लक्ष देऊन प्रवाश्यांना हिणाऱ्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, रेल्वे रुंदीकरण झाल्यानंतर मुदखेड - आदिलाबाद रस्त्यावरील अनेक स्थानकावर हिमायतनगर प्लैटफॉर्मचे काम ठेकेदाराकडून कण्यात आले, मात्र यात जिल्ह्यातील काही ठेकेदाराने टक्केवारीवर कामे घेऊन अत्यंत निकृस्थ पद्धतीची केली. उलट प्लैटफॉर्म व रेल्वे उभी राहण्यातील रुंदी, उंची आवश्यक प्रमाणात ठेवण्यात कुचराई करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळ फेक केली आहे. या प्रकारामुळे मागील तीन वर्षात किनवट - बोधडी - धानोरा - इस्लापूर - हिमायतनगर -पारवा - हदगाव रोड - थेरबन- भोकर - मुदखेड या स्थानका दरम्यान शेकडो प्रवाश्यांना आपला बळी द्यावा लागल्याचे सर्व श्रुत आहे. तर अनेकांना आपले पाय गमवावे लागल्याने दुसायावर विसंबून राहण्याची वेळ आल्याचे अनेक जिवंत उदाहरण पहावयास मिळत आहेत. तरी सुद्धा रेल्वे प्रशासन या दुर्घटनेच्या प्रकाराकडे गंभीरतेने लक्ष देत नसल्यामुळे घटना थांबण्याच्या तर सोडाच उलट वाढच होत असल्याचे दिसून येत आहे.

याचा प्रत्यय दि.१७ मंगळवारी आला असून, तिरुपती - आदिलाबाद - हु.साहिब नांदेड या कुष्णा एक्स्प्रेस मधून प्रवास करणाऱ्या नागरिक यात्रेकरूना आला असून, सदर घटना डोळ्यादेखत घडल्यामुळे अनेकांची मने गहीवरल्याचे दिसून आले आहे. सकाळी ५.३० वाजता कुष्णा एक्स्प्रेस हिमायतनगर रेल्वे स्थानकावर पोहोंचली होती. मात्र या ठिकाणी रेल्वे थांबण्यासाठी केवळ ३ मिनिटाचा वेळ असल्या कारणाने सिकंदराबाद येथून आदिलाबाद कडे जाणारा वृद्ध अब्दुल खादर वय ६५ वर्ष हे हिमायतनगर येथे आलेल्या मुलीस भेटून जावे या उद्देशाने उतरत होते. मात्र ऐन वेळी रेल्वेसुरू होऊन निघाल्याने खाली उतरताना हात निसटून तोल गेला. यात मयत वृद्ध हे थेट रेल्वे आणि प्लैटफॉर्म यामधील अंतराच्या फटीतून रेल्वे खाली आले. ते फरफटत थेट ५७/७ कि.मी.च्या फलकाजवळ घासत आले, त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला व डोक्याला गंभीर मार लागून रेल्वे खाली चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच रेल्वे थांबविण्यात आली असून, याची माहिती स्टेशन मास्तर यांना देऊन अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर आदिलाबाद्कडे रवाना झाली आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक दाखल झाले असून, वृत्त लोहीपर्यंत रेल्वे पोलिस दाखल्झाली नसल्याने मयताचे शव रेल्वे पटरीवर होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी