नागरिकांचे आरोग्य धोक्यात

हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील खाजगी दवाखाने व मेडिकल स्टोर्स मधील जैविक कचरा उघड्यावर टाकण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकाराकडे वैद्यकीय अधीक्षकांनी लक्ष देऊन कचर्याची विल्हेवाट न लावणाऱ्या दवाखान्यासह मेडिकल स्टोर्स वर कायावाही कारवाई अशी मागणी आरोग्य प्रेमी नागरीकातून केली जात आहे.

याबाबत सविस्तर असे कि, विदर्भ - मराठवाडा व अंध्राप्रदेशाच्या सीमेवर हिमायतनगर शहर वसलेली आहे. येथील बाजारपेठ मोठी असून, विविध आजाराने जडलेले रुग्ण व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे शहरात खाजगी रुग्णालयाची संख्या सुद्धा दिवसागणिक वाढत आहे. या ठिकाणी उपचारासाठी येणर्या रुग्णांना उपचारासाठी वापण्यात येणारी निडल्स, औषधे, इंजेक्शन, सलाईन बॉटल, बैन्डेज पट्टी, रबरी हातमोजे, कापसाचे बोळे, तसेच अन्य कालबाह्य झालेली औषधी हि नष्ठ न करता थेट शहराच्या रस्त्यावरील नाल्यात व उकांड्यावर टाकली जात आहे. परिणामी पैसारातील नागरिक व उकिरड्यावर फिरणारे बालक तथा वयोवृद्ध नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा जैविक कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने शहरातील नाल्या खच्च खच्च भरत आहेत. हा प्रकार नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या उच्च शिक्षित डॉक्टराकरावी केला जात असल्यामुळे सामन्यांचे आरोग्य बिघडविण्यास हेच महाशय कारणीभूत ठरत असल्याने सामान्य नागरीकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरात काही अल्पशिक्षित आणि कमी पगारात अधिक काम करणाऱ्या नौकर वर्गांवर काही डॉक्टरांची भिस्त असून, यात काही मेडिकल स्टोर्सचा कारभार सुद्धा डी. फार्मसी डिगरी नसलेल्यांवर सोडला जात आहे. खरे पाहता हा सर्व प्रकार अन्न औषध प्रशासन व स्थानिकाच्या वैद्यकीय अधीक्षकांना माहित असताना देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने थेट रस्त्यावर जैविक कचरा फेकला जात असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय नियमानुसार हा जैविक कचरा योग्य रीतीने नष्ठ करून विल्हेवाट लावणे हि संबंधित डॉक्टरांची जबाबदारी आहे. परंतु पैसे कमाविण्यात रस दाखविणारे काही डॉक्टरच या कचर्याच्या विल्हेवाट लावण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे याचा परिणाम लहान मुले, मोकाट जनावरे, कचरा वेचानार्यांवर होत असून, यास जबादार कोण असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत. या प्रकाराकडे संबंधित विभागाच्या धीकार्यानी गंभीरतेने लक्ष देऊन संबंधिताना सूचना द्याव्यात अशी मागणी आरोग्य प्रेमींकडून होत आहे.

याबाबत आरोग्य अधिकारी श्री शेळके यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले कि, जैविक कचरा नष्ठ न करता उकीडे, नाल्यात व रस्त्यावर फेकानार्याना प्रथम नोटीस बजावणार आहे. यासाठी स्थानिक ग्राम पंचायत व प्रदूषण मंडळाने कार्यवाही करावी असे सुचविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी