३० रोजी मोदीची सभा

नांदेड लोकसभा महायुतीचे उमेदवारच्या प्रचारार्थ ३० रोजी मोदीची सभा

नांदेड(खास प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार तथा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची नांदेड येथे गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर ३० मार्च रोजी दुपारी १२ वाजता प्रचंड जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी पत्र परिषदेत दिली.

नांदेड लोकसभा महायुतीचे उमेदवार डी.बी. पाटील, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुभाष वानखेडे, लातूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. गायकवाड , परभणीचे उमेदवार बंडू जाधव या चार महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची सभा नांदेड येथे आयोजित करण्यात आली असून या सभेसाठी किमान दोन ते अडिच लाख नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीकडून बाळगली जात आहे. शहर व ग्रामीण मधून नागरिकांना या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत असून घरपोच निमंत्रण पोहंचण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

शहरामधील विशिष्ट व अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी व्हीआयपी पासेस देण्यात आल्या असून त्यांना विशेष अतिथीकक्ष निर्माण करण्यात येणार आहे. मोदींची सभा यशस्वी व्हावी यासाठी १५ ते १६ विविध समित्या काम करत आहेत. २००९ मध्ये मोदींची सभा नांदेड जिल्ह्यात देगलूर येथे घेण्यात आली होती. त्यावेळीचे मोदी आजच्या मोंदीमध्ये जमिन आसमानचा फरक आहे. मोंदीबद्दल देशभरात गत पाच वर्षात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतातील कुठल्याही स्थळी त्याची सभा घेतल्यास प्रचंड जनसमुदाय उपस्थित राहत आहे. त्यामुळे विशेष व्यवस्था या सभेमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोंदीच्या व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, खा. गोपीनाथ मुंडे, उमेदवार डी.बी.पाटील, सुभाष वानखेडे, बंडु जाधव, डॉ. सुनिल गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे. नांदेड जिल्ह्यात ४ ते ६ हजार विशेष निमंत्रण पत्रीका काढण्यात आल्या असून त्या घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ३० जानेवारी रोजी मोदींच्या तीन सभा होणार आहेत. अमरावती, अकोला, नांदेड त्यानंतर कर्नाटकमध्ये बेळगाव, बागलकोट या दोन ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले.

बिहार मधील मोदींची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आहे. यावरुनच लक्षात येते की, त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्यामुळे असा प्रकार ते करत आहेत. या सभेवर हल्ला होणे म्हणजेच भाजपच्या यशाचे गमक असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. २००९ मध्ये मोदींची ज्यावेळी सभा झाली होती त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारास पराभव पत्करावा लागला परंतु यावेळी याच सभेमुळे ७५ हजाराने झालेला पराभव किमान लाखाच्या लिडने भरुन निघेल आणि भाजपचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेस प्रदेश सचिव सुरजितसिंघ ठाकूर, राम पाटील रातोळीकर, डॉ. अजित गोपछडे, प्रविण साले, व्यंकटेश साठे, देविदास राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी