जिल्ह्यात रंगोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा ...
नांदेड(अनिल मादसवार)नांदेड शहरासह जिल्ह्यातील तालुका व ग्रामीण परीसरात चिमुकल्या बालकांनी होळी व रंगोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. यावेळी चिमुकल्या बालकांनी हाती पिचकारी घेवून एकमेकांवर रंग उधळला.
रंग पंचामिनित्त शहरातील बालकांनी सकाळपासून गल्ली बोळासह चौकाचौकात हाती रंगाची बॉटल व पिचकारी घेवून गर्दी केली होती. तर ठीक ठिकाणी युवकांनी डीजेच्या तालावर ठेका धरत रंगोत्सव साजरा केला. तर काही ठिकाणी युवकांनी मुख्य चौकात दहीहंडी फोडून रंगोत्सवाचा समारोप केला. तसेच बैण्ड बाज्याच्या गजरात शहरातून मिरवणूक काढून आप्तस्वकीय मित्र - मैत्रीणीना रंगाने रंगून आनंदोत्सव साजरा केला. रंगपंचमीत लहान थोर अबाल वृधांसह विशेषतः ग्रामीण भागातील महिला मुलीनीही सहभाग घेवून " हम भी किसी से कम नही " हे दाखवून दिले आहे. एकूणच जिल्ह्यात शांततेत व आनंदाच्या वातावरणात होळी व रंगोत्सव साजरा करण्यात आला. सन उत्सव शांततेत पार पडावे यासठी ठीक ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावून भांडणास कारणीभूत ठरू पाहणाऱ्या दारू विक्रीवर बंदी आणली होती. तरी सुद्धा पोलिसांच्या बंदीला झुगारून राज्य मार्गावरील ढाबे, देशीच्या अड्यावरून काही प्रमाणात विक्री करण्यात आली.
मोदीच्या पिचकार्याना जास्त मागणी
रंगपंचमी निमित्त शहरातील दुकानात रंग व पिचकार्या खरेदीसाठी बालकांनी गर्दी केली होती, यावर्षी निवडणुका होणार असल्याने बाजारात मोदीच्या तैलचित्राच्या पिचकाऱ्या बालकांसाठी विशेष आकर्षण ठरल्या असून, सर्वाधिक विक्री मोदीचे चित्र असलेल्या पिचकारयांची झाली अशी माहिती काही विकेत्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली.