महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेची स्थापना

हिमायतनगर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेची स्थापना
अध्यक्षपदी पांडुरंग गाडगे तर सचिव पदी अनिल मादसवार यांची निवड


हिमायतनगर(वार्ताहर)शहरात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली असून, सर्वानुमते तालुकाध्यक्षपदी पांडुरंग गाडगे, कार्याध्यक्षपदी प्रेमकुमार धर्माधिकारी, उपाध्यक्षपदी दत्ता शिराणे, सचिवपदी अनिल मादसवार, यांनी निवड करणात आली आहे. नूतन कार्यकारिणीच्या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष अभयकुमार दांडगे, सरचिटणीस रुपेश पाडमुख, कार्याध्यक्ष कृष्णा जोमेगावकर यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

दि.१४ रोज शुक्रवारी येथील शासकिय विश्राम ग्रहात येथील अधिकृत पत्रकारांची बैठक जेष्ठ पत्रकार भास्करकाका दुसे, जिल्हाध्यक्ष अभयकुमार दांडगे, सरचिटणीस रुपेश पाडमुख, कार्याध्यक्ष कृष्णा जोमेगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी सर्वानुमते ग्रामीण उपाध्यक्षपदी परमेश्वर शिंदे, कोषाध्यक्ष पदी अनिल भोरे, संघटक पदी कानबा पोपलवार, सहसचिवपदी साईनाथ धोबे, सहकोषाध्यक्ष पदी फाहद खान, सल्लागार म्हणून भास्करकाका दुसे, चांदराव वानखेडे, सदस्यपदी संजय कवडे, धम्मपाल मुनेश्वर, छायाचित्रकार म्हणून विष्णू जाधव यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पत्रकार संघाच्या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे पेढा भरवून अभिनंदन करून उपस्थित मान्यवरांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी