नांदेड(अनिल मादसवार)स्वामी विवेकानंदाने अवघ्या विसाव्यावर्षी जागतिक शिकागो परिषदेमध्ये, माझे प्रिय बंधु आणि भगीनींनो, असे म्हणून पुर्ण जगाला जिंकले होते. हे कौशल्य स्वामी विवेकानंदामध्ये होते. हेच आव्हाण आज आमच्या विद्यार्थ्यांसमोर आहे. स्वामी विवेकानंदाची एकाग्रता हीच चमत्कारीक शक्ती होती. आजच्या युवाशक्तीने स्वामीजींचा मन एकाग्रतेच्या आदर्शाचे जरी पालन केले तर ते आपल्या प्रत्येक ध्येयात यशस्वी होतील, असे मत दै. लोकमतचे संपादक विजय कुवळेकर यांनी आज दि. ११ जानेवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या १५१ व्या जयंती निमित्त ‘युवा शक्ती आणि स्वामी विवेकानंद’ या विषयावरील आयोजित व्याख्यानात कुसूम सभागृहामध्ये बोलतांना व्यक्त केले. ...........