संतज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी सोहळा थाटात संपन्न
हिमायतनगर(अनिल मादसवार)मौजे एकंबा येथील वारकरी सांप्रदाईक महिला भजनी मंडळाच्या वतीने ज्ञानेश्वर माउली संजीवन समाधी सोहळा कार्यक्रम तालुक्याचे आ. माधवराव पाटील जवळ गावकर यांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. यावेळी मंचावर कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराम पाटील करंजीकर, माजी संचालक शे.रफिक सेठ, जेष्ठ पत्रकार देविदास मुधोळकर, विजयालक्ष्मी मादसवार, वामनराव कुरमे, पत्रकार धम्मपाल मुनेश्वर, प्रभू महाराज पिटलेवाड यांची उपस्थिती होती. ...........