शिवाजी देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत निषेध

देशमुख यांच्यावरील हल्ल्याचा पत्रकार संघटनांकडून निषेध

हिमायतनगर पत्रकार संघाकडून निषेध 

हदगाव येथील नांदेड न्युज लाइव्ह्चे पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यासह तिघांजणावर काही समाजकंटकांनी शनिवारी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समजताच हिमायतनगर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने माझी अध्यक्ष कानबा पोपलवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील उत्कर्ष फोटो गैलरी येथे बैठक घेण्यात येवून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. तसेच अश्या सराईत गुन्हेगार हल्लेखोरांवर कठोर कार्यवाही करून अश्या घटनांना आवर घालावा अशी मागणी करण्यात अली आहे. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष जांबुवंत मिराशे, अशोक अनगुलवार, अनिल भोरे, अनिल मादसवार, दत्ता शिराने, परमेश्वर शिंदे, प्रेमकुमार धर्माधिकारी, सुभाष गुंडेकर, साईनाथ धोबे, फाहद खान, असद मौलाना, सचिन माने, धम्मपाल मुनेश्वर, नागोराव शिंदे, चांदराव वानखेडे, अ.गन्नि, गंगाधर पडवळे, आनंद मोरे, सर्व पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते आकाश ढोणे, केदार ताटेवाड, निरंजन मिराशे, रवि आलेवाड, श्रीनिवास बोम्पिलवार, बजरंग टेंभीकर, शिवप्रसाद सागर यांच्यासह अनेक पत्रकार, छायाचित्रकार व वृत्त पत्र विक्रेते उपस्थिती होती...........http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4666&cat=Latestnews

नांदेड(प्रतिनिधी)हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत हदगाव तालुका संघातर्फे निषेध करण्यात आला. 

राजकीय बातमी दिल्याचा राग मनात ठेवून नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर शनिवारी चौघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला होता, परंतु देशमुख यांनी चाकूचा वार चुकविला आणि बालंबाल बचावले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी