सततच्या पावसाने शेतकऱ्यांसह मळणीयंत्र चालकावर संक्रांत....हाताला आलेले सोयाबीन मातीत मिसळल्याने काढणीची कामे ठप्प
हिमायतनगर(अनिलमादसवार)तालुक्यासह ग्रामीण परिसरात मागील महिन्यापासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे हाताला आलेले सोयाबीन पिकांना चवरे फुटले असून, उर्वरित सोयाबीनचे पीकही आता मातीत मिसळे आहे. परिणामी पाणी असलेल्या व ओल्या जमिनीतील सोयाबीन काढणीची कामे ठप्प झाली असल्याने परप्रांतातून दाखल झालेल्या मळणीयंत्र चालकासह शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, आगामी काळातील दिवाळी काळोखात साजरी कण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. .......