गीत-नृत्य आणि धमाल कॉमेडीचा एकत्रित प्रयोग
पुणे। रसिक प्रेक्षकांना एकाच प्रयोगात दिलखेचक नृत्य,बहारदार गायन आणि धमाल कॉमेडीचा एकत्रित आस्वाद देणारी नवी संकल्पना 'टेस्टी मिसळ' या प्रयोगाद्वारे जागतिक रंगभूमीनिमित्त रंगमंचावर येत आहे.'श्री क्रिएशन्स' प्रस्तुत या प्रयोगाद्वारे महाराष्ट्रात नवी संकल्पना रुजविण्यासाठी पुण्याचे कलाकार सज्ज झाले आहेत.महाराष्ट्र दौऱ्यातील शुभारंभाचा प्रयोग नासिकच्या साईखेडकर नाट्यमंदिर येथे ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
या प्रयोगात आरती दीक्षित गीते प्रस्तुत करणार आहेत.स्वाती धोकटे,विनोद धोकटे नृत्य प्रस्तुत करणार आहेत तर चैताली माजगावकर-भंडारी या कॉमेडीचा तडका देणार आहेत.जागतिक रंगभूमी दिनानिमित्त प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ देखील या प्रयोगा दरम्यान काढण्यात येणार आहे. त्यासाठी 9822709730 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल,असे आरती दीक्षित यांनी सांगितले.