तंबाखू नियंत्रण पथकामार्फत भोकर येथे 15 विक्रेत्यांवर कारवाई -NNL


भोकर/नांदेड|
भोकर शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने भोकर येथे अचानक धाडी टाकली. या धाडीत 15 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली असून या विक्रेत्यांना 9 हजार 300 रुपयाचा दंड आकारला आहे. 

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर तसेच स्थानिक पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पी. एन. बाचेवाड आदी होते. 

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी