शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम पडेपर्यत आमरण ऊपोषण सुरु ठेवणार ऊपोषणकर्ते
नांदेड| वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करुन पण पिक विमा वाटप केले नसल्यामुळे तात्काळ नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांना दिवाळीपुर्व 25 टक्के आगाऊ रक्कम जमा करण्याचा मागणीसाठी बालाजी पाटील सांगवीकर,बालाजी पाटील ढोसणे,अनिल दापके,गजानन पा.होटाळकर,अकुंश पा.कोल्हे या शेतकरी पुञाने आमरण ऊपोषण सुरु केले आहे.
यामध्ये प्रशासनाने कडे वारवार निवेदन पाठपुरावा करुन पण पिक विमा जमा होत नाही. आणी शेजारच्या जालना जिल्ह्यात शेतकर्यांच्या खात्यावर पिकविम्याची रक्कम जमा झाली. पण नांदेडला झाले नसल्याने आज ऊपौषणाची वेळ आमच्यावर आल्याचे ऊपौषणकर्ते यांनी सांगीतले आणी जिल्हाधिकारी नांदेड यांनी आगाऊ रक्कमेची अधिसुचना काढुन पण एक महिना झाल्यानंतरही पिक विमा कंपनी अधिसुचनेचे पालन करीत नाही. त्यामुळे कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा,तात्काळ शेतकर्यांच्या खात्यावर पिकविमा जमा करण्यात यावा अशा मागण्या करण्यात आला यावेळी विविध संघटना,पक्ष व कार्यकर्त्यानी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
तर शेतकर्यांना गांजा पिकविण्याची परवानगी द्या — बालाजी ढोसणे यांची मागणी
प्रशासन हे शेतकर्यांच्या गांजाच्या शेती केली तर तात्काळ धाड पडते पण एकीकडे शेतीचे नदी नाले झाले. पण अद्याप पंचनाम्यासाठी कुणीही येत नसल्याने गांजासाठी तत्परता दाखळिता तर गांजा पिकविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी पुञ संर्घष समितीचे बालाजी ढोसणे यांनी केल्याने खळबळ ऊडाली.