गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात 7.48 कोटी वितरीत -NNL


नांदेड|
शेती व्यवसाय करतांना होणाऱ्या विविध अपघातामुळे शेतकऱ्यांच्या मृत्यू ओढावल्यास अथवा अपंगत्व आल्यास संबंधित शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेमार्फत विमाछत्र प्रदान करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांना / त्यांच्या कुटुंबियांना प्रकरण परत्वे लाभ दिले जातात. 

अपघाती मृत्यु झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात निकामी झाल्यास  2 लाख रुपये तर अपघातामुळे एक डोळा अथवा एकहात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. नांदेड जिल्ह्यामध्ये सन 2018-19 पासून आजपर्यंत 395 वारसदारांच्या खात्यावर 7 कोटी 48 लाख रुपये रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिली.   

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत नांदेड जिल्ह्यात सन 2018-19 या वर्षात 112 मंजुर प्रस्तावात 2 कोटी 23 लाख रुपये वाटप करण्यात आले. सन 2019-20 मध्ये 149 मंजुर प्रस्तावात 2 कोटी 95 लाख रुपये, सन 2020-21 खंडीत कालावधी 39 मंजूर प्रस्ताव 78 लाख रुपये, तर सन 2021-22 मध्ये 76 प्रस्ताव मंजूर होऊन त्यात 1 कोटी 52 लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील जर कोणी शेतकरी कुटुंबातील सदस्य आपघाग्रस्त झाला असल्यास विहित कागदपत्रांच्या पुर्ततेसह परिपूर्ण प्रस्ताव घटना घडल्यापासून 45 दिवसांच्या आत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी