नांदेड। नांदेड शहरातील व्यंकटेश नगर हिंगोली गेट येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते साई नागेश्वर यांनी आपल्या मुलीच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्चाला बगल देत व्यंकटेश नगर परिसरातील चिमुकल्यांना शालेय साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या साई नागेश्वर यांची कन्या श्रुतिका हिचा आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी तिसरा वाढदिवस तिसरा वाढदिवस साई नागेश्वर यांनी कुटुंब समवेत व्यंकटेश नगर येथील त्यांच्या निवासस्थानी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि आज आसपासच्या परिसरातील चिमुकल्यांना श्री चिरंजीवी श्रुतिका हिच्या वाढदिवसानिमित्त नागेश्वर दांपत्याकडून १०० शाळकरी विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या संचाचे व वह्यांचे खाऊ वाटप करण्यात आले.
मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या काळात शाळा जरी बंद असल्या तरी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने सर्व शालेय शिक्षण सुरू होते नेमकी हीच गरज ओळखून साई नागेश्वर यांनी शालेय साहित्य वाटप करण्याचा निर्णय घेतला यावेळी त्यांनी मुलीच्या प्रत्येक वाढदिवस समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्याचा संकल्प करत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. यावेळी मोठ्या संख्येने व्यंकटेश नगर येथील बालगोपाल चिरंजीवी श्रुतिकाच्या वाढदिवसाला उपस्थित होतेअनाठायी खर्चाला फाटा देत मुलीचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा मागील दोन वर्षापासून त्यांच्या या उपक्रमामुळे नांदेड परिसरात व्यंकटेश नगर त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी अशा पद्धतीने उपक्रम करावेत व अनावश्यक खर्च टाळावा. असे आव्हान त्यांनी समाजापुढे केल्यामुळे साई नागेश्वर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.