पशुपालकांनी लम्पी आजाराला वेळीच आळा घालावा --डॉ. आर. एम. पुरी -NNL


लोहा|
लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व म्हशी  वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. लम्पी स्कीन हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे  पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. याकरिता पशुपालकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ एम आर पुरी यांनी केले आहे..

डॉ एम आर पुरी यांनी सांगितले की या आजाराची प्रमुख लक्षणेआजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांचे चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. १०४ ते १०५ डिग्री  ताप येतो. अचानक दुधाचे प्रमाण कमी होते. जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणी येतं. लसिकाग्रंथीना सूज येते. हळूहळू डोके, मान, मायांग, कास इ. भागाच्या त्वचेवर १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी येतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात. तसेच दृष्टी बाधित होते. काही जनावरांना पायावर सूज येवून ते लंगडतात. अशी लक्षणे असतात त्यामुळे पशुपालकांनी काळजी घ्यावी.

लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये. याकरिता पशुपालकांनी आवश्यक ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये. जनावरामध्ये हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे रोग सदृश लक्षणे आढळल्यास जनावरांचा ताप मोजावा व जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.

लम्पी स्कीन रोग औषधोपचाराने निश्चित बरा होत असल्याने, पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची शक्यता आढळून आल्यास माहीती तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात द्यावि असे आवाहन डॉ. मधुसूदन रत्नपारखी जिल्हा पशुसंवर्धन  उपायुक्त, डॉ. भूपेंद्र बोधनकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व डॉ. आर. एम. पुरी पशुधन विकास अधिकारी सोनखेड यानि केले आहे. डास, माशा, गोचीडांचा करता बंदोबस्त IIलंपी रोगाचा होईल अस्त II असा नारा देण्यात आला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी