नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नावघाट येथे साफसफाई मोहीम..NNL



नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार गणेशोत्सव २०२२ अंतर्गत नदीघाट विसर्जन परिसर स्वच्छ दिसवा या साठी शहरातील सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या घाट परिसर मोहीम तिनं दिवस आयोजित करण्यात आली होती यात शेवटच्या दिवशी ८ सप्टेंबर रोजी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या नाव घाट व ईतवारा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत होळी घाट परिसरात उपायुक्त खानसोळे व  स्वच्छता विभागाचे उपायुक्त निलेश सुंकेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयातील व झोन कार्यालय अंतर्गत स्वच्छता अभियान घेण्यात आले या वेळी पत्रकार यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला.

     गणेशोत्सव २०२२ अनुषंगाने मनपा अंतर्गत असलेल्या सहा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विसर्जन घाटावर स्वच्छता अभियान ६ ते ८ सप्टेंबर तिनं दिवस राबविण्यात आले,यात मुख्यालयातील अनेक विभागाचा समावेश होता.

   


 शेवटच्या दिवशी ८ सप्टेंबर रोजी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या नाव घाट परिसरात उपायुक्त खानसोळे व स्वच्छता विभागाचे उपायुक्त निलेश सुंकेवार ,अभियंता संघरतत्न सोनसळे,अभियंता मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त सदाशिव पंतगे, सिडको क्षेत्रीय कार्यालय चे डाक्टर रईसोधदीन,रावण सोनसळे, रमेश चावरे,गणेश शिंगे, स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे, अरजृन बागडी व कार्यालय अधीक्षक विलास गजभारे,कर निरीक्षक दिपक पाटील, सुधीर बैस, सुदास थोरात  राहुल सोनसळे, वसुली लिपीक यांच्या सह मालमत्ता, स्टेडियम, अतिक्रमण, पाणीपुरवठा, गुंठेवारी यांच्या सह पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला.

      गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या केरकचरा, कपडे,घाण ,व साचलेले ढिगारे यासह परिसरातील झाडे व अन्य टाकलेल्या वस्तू नदीघाट किना-या वरून काढण्यात आल्या.व ईतवारा क्षेत्रीय कार्यालय हदित ही गोदावरी नदीच्या काठावर ही मोहीम हाती घेण्यात आली. दुतर्फा केलेल्या स्वच्छता मुळे नदीघाट किना-या वर स्वच्छ व सुंदर दिसु लागला आहे. सहभागी झालेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतल्याने ही तिनं दिवसीय स्वच्छता अभियानचा समारोप झाला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी