ध्येय ठरवून वाटचाल करा - इंजिनीयर शिवाजीराजे पाटील -NNL


नांदेड।
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून वाटचाल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते इंजिनीयर शिवाजीराजे पाटील यांनी केले.

ते श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेडच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने अमृतमहोत्सव वर्षे आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते.

विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ आर.पी.माळी, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ हनुमंत मारोतीराव भोपाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी डॉ हनुमंत भोपाळे यांनी संपादित केलेल्या साफल्य या ग्रंथांची भेट महाविद्यालयास देण्यात आली.

अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.आर.पी.माळी यांनी शिक्षणातून व्यक्ती सुसंस्कृत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ हनुमंत भोपाळे यांनी केले तर आभार डॉ.एल.टी.काळे यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी