अमोल सरोदे, मा.सदस्य, रासेयो सल्लागार सदस्य, स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड
नांदेड| सक्षम नागरिक घडवण्याची संस्था म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना होय ज्याद्वारे श्रमप्रतिष्ठा आणि समाज स्वास्थ टिकवणारे नागरिक घडतात असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त स्वयंसेवक अमोल सरोदे यांनी केले ते कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना स्थापनादिन कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उस्मान गणि हे होते तर विचारपिठावर कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब भुक्तरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नूरजहाँ मोहम्मद शाकीर हिने कुराण-ए- तीलावत केली. प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. बाबासाहेब भूकतरे यांनी केले.पुढे अमोल सरोदे म्हणाले की, समाज स्वास्थ्य टिकवण्यासाठी जबाबदार नागरिकांची आवश्यकता असते.
नागरिकांना आपले हक्क आणि जबाबदारी यांची जाणीव असली पाहिजे, तसेच त्यांचे व्यक्तिमत्व देखील प्रभावी बनले पाहिजे.यासाठी राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रभावीपणे कार्य करून नागरिक घडवण्याचे काम करते. त्यामुळेच समाजाचा देशाचा विकास होण्यास मदत होते. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.उस्मान गणी यांनी विद्यार्थ्यांची जडणघडण होत असताना शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष दिले पाहिजे तरच प्रभावी व्यक्तिमत्व घडते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सय्यद सलमान फारूख यांनी केले तर आभार प्रा.शेख नजीर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.मोहम्मद इस्माईल,प्रा.खान नदीम परवेज,प्रा.पुष्पा क्षिरसागर, प्रा. स्मिता कोंडेवार प्रा.फरजाना बेगम,प्रा.नुरी मॅडम, प्रा.दानिश, प्रा.शिवकुमार भांडवलकर, प्रा.भोसले, प्रा.अब्दुल अहद प्रा.सनोबर मॅडम, अक्षय हासेवाड, मोहम्मद मोहसिन, गौस खान,सुरेखा कोमटवार आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.