पोलिसांची करडी नजर असून, डीजे वाजवणाऱ्यावर होणार -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला प्रशासनाने पूर्वतयारी केली सर्व हालचालीवर पोलिसांची करडी नजर असून, डीजे वाजवणाऱ्यावर कारवाई होणार आहे. नगरपालिका प्रशासनाने मिरवणूक मार्गासह विसर्जन घाटावर तयारी पूर्ण केली असून, किनवट पोलीस स्टेशन हद्दीत एकूण ८०  गणपतीचे विसर्जन उद्या संपन्न होणार आहेत.

त्यात किनवट शहरात 16 परवानाधारक ग्रामीणमध्ये फक्त 11 गणपती परवानाधारका २७  परवानाधारक गणपती व इतर ८३  गणपती असा एकूण ८०  गणपतीचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस प्रशासन सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहे. किनवट पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक अभिमन्यू सोळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली ६ पोलीस अधिकारी ३० पोलीस कर्मवीर २० होमगार्ड महिला कर्मचारी असा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

डीजे वाजवण्यावर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी शहरातील मिरवणुकी मार्गाचे काम पुन्हा सुरू केले. विसर्जन घाटावर नगरपालिका प्रसादाचे पथदिव्याची व्यवस्था विसर्जन करणारे पथक व सर्व ठिकाणी व्यवस्था पूर्ण केली आहे. महसूल विभाग ही या सर्व प्रसिद्ध नियंत्रण ठेवून आहेत. तहसीलदार डॉ मृणाल  जाधव यांनी सर्व आढावा घेतला आहे. गणपती विसर्जन शांततेत पार पाडा असे आव्हान सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजारी यांनी सर्व गणेश भक्तांना केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी