नविन नांदेड। ८७ दक्षिण मतदारसंघातील जास्तीत जास्त मतदार नांदेड महानगरात वास्तव्यास आहेत. महसूल प्रशासन व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने निवडणूक ओळखपत्राशी आधार जोडणी बाबत शहरातील मतदारांसाठी रविवार दि.२५ सप्टेंबर रोजी सिडको शहरातील मनपाच्या सिडको क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत कामगार कल्याण केद्र सिडको या ठिकाणी मतदार ओळखपत्रास आधार लिंक करण्यासाठी मतदारांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील जेष्ठ नागरिक महिला युवक यांनी प्रतिसाद देत शहरी भागातील मतदारांनी आधार लिंक करून घेतले, यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ.रईसौधदीन ,मंडळ अधिकारी नांदेडकर यांच्या सह बि.एल.ओ उपस्थित होते.
२५ सप्टेंबर रोजी सिडको कामगार कल्याण केद्र मंडळ या ठिकाणी सिडको हडको परिसरातील महानगरपालिकाचे वसूली लिपिक, सर्व मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अर्थात बिएलओ, या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदार लिंक करून घेतले.
सिडको हडको झोन मधील मतदाराकरिता कामगार कल्याण केंद्र परिसरात कॅम्पचे आयोजन,नांदेड उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार किरण अंबेकर मनपा सिडको क्षेत्रिय सहाय्यक आयुक्त डॉ.रईसौधदीन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधिक्षक विलास गजभारे, कर निरीक्षक सुधीर बैस,दिपक पाटील, सुदास थोरात,स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे, अर्जुन बागडी व वसुली लिपीक यांच्या सह मंडळ अधिकारी गजानन नांदेड, प्रशासनाचे तलाठी प्रदीप पाटील, सि.एस.कंगळे, सहाय्यक व्यंकटी इंगळे,प्रकाश वाघमारे,चिंतोरे, सुदर्शन गजभारे व चार सुपरवायझर,३२ बि,एल.ओ व व ईतर कर्मचारी यांनी सहकार्य केले..