हिमायतनगर| तालुक्यातील चिंचोंर्डी प्राथमिक आरोग्य केंद्रात शिवणी, ईस्लापूर, सरसम, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपआरोग्य केंद्रातील 135 महिलांचे कुटूंब कल्याण शस्ञक्रिया करण्यास 21 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता सुरुवात झाली असल्याची माहिती डाॅ. नखाते,डाॅ.सुप्रिया पल्लेवाड यांनी दिली आहे. चिचोंर्डी प्रा. आरोग्य केंद्र आदिवाशी, बंजारा बहुल भागातील असून 135 महिलाची शस्ञक्रिया पहिल्यांदा होत आहे.
कुंटूंब कल्याण शस्ञक्रिया सर्जन डाॅ. अशोक बेलखेडे किनवट याच्या नेतृत्वाखाली डाॅ. सुप्रिया पल्लेवाड, चिंचोर्डी,डाॅ. नखाते,सरसम डाॅ.के.पी. गायकवाड ईस्लापूर, डाॅ.पोपुलवाड मॅडम ,ता. आरोग्य अधिकारी पोहरे आदीने 135 महिलांची शस्ञक्रिया केली आहे. चिंचोर्डी प्रा. आरोग्य केंद्राला याञेचे स्वरुप आले आहे. शिवणी, ईस्लापूर, सरसम, चिंचोर्डी प्रा. आरोग्य केंद्रा अंतर्गत उपआरोग्य केंद्रातील 135 महिलांनी कुटूंब कल्याण शस्ञक्रिया केली आहे. या सर्व डाॅक्टरांच्या मदतीला रामदास डोखळे, गणेश बिच्चेवार, वाळके सिस्टर, राव सिस्टर, वाघतकर सिस्टर, दवणे सिस्टर, सेवंतवाड सिस्टर,सुर्यवंशी सिस्टर ,वाझे आरोग्य सेवक अशी टिम मदतीला होती.