लिंबगाव गाव प्राथमिक आरोग्य केंद्रात थोडसं माय- बापासाठी पण ज्येष्ठांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर -NNL


नांदेड|
तालुक्यातील लिंबगाव अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर (घुगे) तथा प्रशासक जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे नांदेड यांच्या सूचनेनुसार दिनांक 21 सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबगाव तालुका नांदेड येथे साठ वर्षे वरील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

तसेच मोजे उपकेंद्र सायाळ येथे ज्येष्ठ नागरिकांना काठी वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी डॉ चंदनकर ए एल नेत्र चिकित्सक अधिकारी जिल्हा प्रशासन रुग्णालय नांदेड आणि थोडसं माय- बापासाठी या उपक्रमाचे नोडल ऑफिसर डॉ सत्यनारायण मुरमुरे जिल्हा परिषद नांदेड डॉ मुंडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ पंडित डवले वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबगाव व सर्व उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी आणि उपस्थित सर्व कर्मचारी वर्ग प्राथमिक आरोग्य केंद्र लिंबगाव परिसरातील ज्येष्ठ आणि मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी