सामान्यांच्या शक्तीतूनच चांगल्या कामांना बळ-डॉ.व्यंकटेश काब्दे -NNL


नांदेड|
सर्वसामान्यांमध्ये असलेल्या इच्छा व शक्तीतूनच चांगले काम करणार्‍यांना बळ मिळते अशा शब्दात डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय टपाल खात्याच्या माय स्टॅम्प योजनेतून डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या नावाच्या पोस्ट तिकीटाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

कयाधू ग्रामविकास प्रतिष्ठाणच्यावतीने मराठवाडा जनता विकास परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या वाढदिवसानिमित्त माय स्टॅम्प टपाल तिकीटासाठी प्रयत्न करण्यात आले. या टपाल तिकीटाचे प्रकाशन स्वतः माजी खा.डॉ. काब्दे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.वानखेडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना डॉ.काब्दे म्हणाले की, तुमच्या सारख्या सहकार्‍यांमुळेच आयुष्यात थोडेफार काम करता आले. 

माझ्या आयुष्याच्या उत्तराधार्थात असा क्षण येणे हे आनंददायी आहे. यातुन समाजासाठी काम करणार्‍यांना व उर्जा व प्रेरणा मिळेल, असे सांगुन सामान्यांच्या शक्तीतूनच विकासाला आणि चांगल्या कामांना गती आणि बळ मिळेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.काब्दे यांच्या आई-वडिलांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेणुकादास वैद्य यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.आदिती काब्दे यांनी केले. 

यावेळी वाकडेकाका, क्षिजा काब्दे, अब्दुल रहीम, डॉ.आर.एस.धांडे, डॉ.अजित काब्दे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य राजाराम वट्टमवार, नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव श्यामल पत्की, प्रफुल्ल अग्रवाल, डॉ.थोरात, शंतनु डोईफोडे, ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, प्राचार्य आर.एम.जाधव, इंजि.द.मा.रेड्डी, प्रा.बालाजी कोम्पलवार, सूर्यकांत वाणी, कॉ.के.के.जांबकर, प्रा.डॉ.अशोक सिद्धेवाड, प्रा.लक्ष्मण शिंदे, प्रा.अशोक काळे, डॉ.पुष्पा कोकीळ, ऍड.धोंडीबा पवार, अय्यर, राज गोडबोले, प्रा.कपिल धुतमल, डॉ.राठी, डॉ.येरावार, डॉ.अमोल गोरे, महेश शुक्ला यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी