नांदेड| जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन नांदेड च्या वतीने गुणवंत खेळाडू व त्याच्या माता-पितांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम श्री बालाजी मंदिर कल्याण सभा मंडप हडको येथे ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री मोरे काका व अरुण दमकोंडवार हे उपस्थित होते. यांच्या शुभहस्ते तीस खेळाडूना पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या मातापित्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे सचिव एकनाथ पाटील यांनी केले होते.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल वडेपुरी येथे दहा दिवसीय मोफत कराटे प्रशिक्षण शिबिर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद हायस्कूल वडेपुरी येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी काळेवाड यांच्या शुभहस्ते नारळ फोडून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी लोहार एस एम पांचाळ सर नकुलवार सर पाटील डीपी नागरगोजे एस आर गिरी मॅडम मादगळेकर पी चव्हाण व्ही व्ही केंद्र सर हे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील जास्तीत जास्त खेळाडू निर्माण व्हावे व मुलींना स्वतःचे संरक्षण करता यावे. या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे मुख्य प्रशिक्षक सेन्साई एकनाथ पाटील सहप्रशिक्षक सात बोडके बजरंग भुरेवार बालाजी एलपुलवाड हे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. दोन्ही उपक्रमाचे अभिनंदन नांदेडचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री राजेश्वर मारावार क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर वरिष्ठ लिपिक संतोष कंनकावार व्यवस्थापक संजू चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्नेहल जाधव विष्णू जाधव सौरभ पवार यांनी परिश्रम घेतले.