गोर बंजारा तीज उत्सव समिती वाशी येथील तीज महोत्सव विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न -NNL


हिमायतनगर।
तालुक्यातील वाशी तांडा येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी माता जगदंबा च्या कृपेने,  संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने दरवर्षी तीज उत्सवाचे आयोजन केले जाते, यावर्षी ही वाशी तांडा येथे तीज महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या तिज महोत्सव नऊ दिवसांचा आयोजित करण्यात आला होता. या नऊ दिवसांमध्ये गावातील सर्व महिला,मुली व पुरुषांनी या माता जगदंबा ची  तीजेची पूजा-अर्चना केली जाते. अखेर आज तीच महोत्सवाचा विसर्जन करण्यात आले. त्यावेळेस गोर बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

गोर बंजारा समाजामध्ये तीच उत्सव म्हणजे मागील 7000 वर्ष पूर्वीपासून गोर बंजारा समाज तीच उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सिंधू घाटी मोहन जोदारो हरप्पा येथून तीज महोत्सव साजरा करण्याचा निर्धार गोर बंजारा समाजाने घेतला होता. आजही भारतातील गोर बंजारा समाज तीज उत्सव साजरा करतो सिंधू संस्कृती ला जपत प्रत्येक तांडा वाडी मध्ये हा सण साजरा करण्यात येते तीज महानजे एका दुरडीमध्ये गहू टाकून नऊ दिवसाचे नंतर त्या ठिकाणी गावातील तरुणी व वेगवेगळ्या तांड्यातील तरुणींना त्या सणाचा मोठ्या उत्साहाने तिज हा सण साजरा केला जातो.

 त्याचप्रमाणे आज हिमायतनगर तालुक्यामध्ये गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये वाशी तांडा येथे  हिमायतनगर गोरसेनेचे तालुकाध्यक्ष- सुनील चव्हाण बाऱ्हाळी यांनी वाशी तांडा तिज उत्सव कार्यक्रमात बंजारा संस्कृती विषयी उपस्थित्यांना संबोधित केले यावेळी गावातील वाशी ग्रामपंचायतीचे सरपंच - शिल्पाताई गुलाबराव राठोड, बंजारा तीज महोत्सव समितीचे आयोजक - गुलाबराव राठोड, आनंद चव्हाण, बदुसिंग जाधव, नितीन राठोड  वाशी नगरिचे रामजी नायक, दत्ता कारभारी,बन्सी बळीराम, अरविंद जाधव, पंडित राठोड साई जाधव,डाओ, सानों, हसाबी, नसाबी,पुजारी,व महिला, मुली व, गोरसेनेचे लावा-लष्कर कर  गावातील सर्वच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गोरसेना हिमायतनगर संपूर्ण टीम त्या कार्यक्रमास हजेरी लावली व संघटना बांधण्याची चर्चा ही केले. 

त्यावेळेस गोर सेना  तालुकां प्रसिद्धी प्रमुख कृष्णा राठोड बोरागडीकर यांनी अशाच पद्धतीने पुढेही भरभरून प्रतिसाद द्यावे व समाजामध्ये रूढी परंपरा धाटी जपून ठेवावे व गोर बंजारा समाजाचे तीज सना सारखे गोर बंजारा समाजातील  सर्वच  नागरिकांनी हा उत्सव सन साजरा करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रम चे सूत्रसंचालन साईनाथ जाधव यांनी केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी