हिंगोली| भारतीय संस्कृती आणि परंपरेचे आज अनेक देशाकडुन अनुकरण केले जात आहे. हे खरे असले तरी, काही भारतीय बांधव मात्र या उलट भारतीय संस्कृती आणि परंपरा विसरुन पाश्चत्य संस्कृतीला अधिक महत्व देतांना दिसून येतात. पाश्चात्य संस्कृतीच्या दिखाऊपणाला बळी पडल्याने खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. भविष्यात पर्यावरणाची हाणी होणार नाही याची खबरदारी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. या उद्देशाने गोदावरी फाऊंडेशनने एक पाऊल पुढे टाकत मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यास उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
गोदावरी फाऊंडेशनचे व संस्थेचे संस्थापक तथा खासदार हेमंत पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्ष राजश्री पाटील व सचिव धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच विविध सामाजिक व सांस्कृतीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गोदावरी फाउंडेशन हिंगोलीच्या वतीने हिंगोली येथे शासकीय विश्रामगृह शनिवारी (दि.२७) मोफत पर्यावरण पूरक शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याची प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस हिंगोली शहरासह आजूबाजूच्या गाव परिसरातील महिला, मुलींसह बालकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेस कार्यशाळेला दिव्या महाजन यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच त्यांनी शाडू मातीचे महत्त्व पटवून देत, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून प्रदूषण कसे होते हे पटवून दिले. गणेशोत्सवात मोठय़ा प्रमाणात ध्वनी व जलप्रदूषण होत असल्याने हा उत्सव पर्यावरणपूरक म्हणून साजरा करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. शाडू मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची स्थापना केली तर प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असेही त्या म्हणाल्या.
तसेच सुनीता मुळे, संगीता चौधरी यांनी सुद्धा उपस्थिताना मार्गदर्शन केले . या कार्यशाळेस अध्यक्ष म्हणून सुनीता मुळे यांची तर प्रमुख म्हणून संगीता चौधरी व गोदावरी अर्बन हिंगोली शाखा व्यवस्थापक प्रदीप देशपांडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी राजश्रीताई क्षीरसागर, भारती महाजन, गोदावरी फाउंडेशन हिंगोलीचे शिवाजी पातळे, सोनल सुलभेवार, गोदावरी अर्बन बँकेचे रक्षणदा मुखीरवार, श्रुती कोंडावार, ममता ओझा, रंजना हरणे, अमोल बुद्रुक, विठ्ठल कावरखे यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेमध्ये शंभरपेक्षा अधिक महिला व मुलींनी सहभाग घेतला होता. शिवाजी पातळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर, सोनल सुलभेवर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यशाळेत सहभागींना प्रमाणपत्र व मोफत साहित्य गोदावरी फाउंडेशनच्या वतीने सर्व सहभागी झालेल्याना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच गणपती बनवण्यासाठी आवश्यक असणारी शाडूची माती यासह सर्व साहित्य मोफत देण्यात आले.
हल्ली कुठल्याही सण हा पर्यावरणापूरक कसा साजरा कसा करता येईल याकडे आपल्या सर्वांचा कल असला पाहिजे. कारण दिवसेंदिवस पर्यावरणाचा तोल ढासळत चालला आहे. यंदा भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्ताने सर्वानी पर्यावरण पूरक श्रीगणेश मूर्तीच बसविन्याचा संकल्प करुन सण उत्सवाच्या माध्यमातून भारतीय परंपरा जपली पाहिजे. ती टिकवली पाहिजे. यासाठी गोदावरी फाऊंडेशनच्या माध्यमातून निशुल्क पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी हिंगोलीत कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यास महिला भगीनींसह बच्चे कंपनीकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ते पहाता अगदी मनापासून समाधान वाटले. -राजश्री पाटील (अध्यक्ष, गोदावरी समुह)