नविन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन येथे प्रवेशद्वार असलेल्या मोकळ्या जागेत मिनी गार्डन असलेल्या मिकी वाक मध्ये विविध प्रकारच्या झाडे लावुन ती लागवड करुन आकर्षक असे मिनी गार्डन केले असून यास जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी भेट देऊन पाहणी करून प्रंशासा केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी आपल्या संकल्पनेतून प्रत्येक पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या मोकळ्या जागेत मिकी वाक मिनी गार्डन मध्ये विविध प्रकारच्या झाडे,व विविध प्रकारच्यी फुले यांच्यी लागवड करण्याचे आदेश दिल्यानंतर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश थोरात, विश्वजीत कासले व पोलीस अंमलदार, महिला पोलिस अंमलदार ,होमगार्ड यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन चा प्रवेशद्वार लगत असलेल्या मोकळ्या जागेत मिनी वाक गार्डन उभारणी केली आहे.
सर्वप्रथम आगोदर वृक्ष लागवड साठी खड्डे करण्यात येऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली त्यानंतर काळी मातीचा साह्याने खड्डे बुजवण्यात येऊन खत व शेणखत साह्याने दैनंदिन पाणी पुरवठा देण्यासाठी काही कर्मचारी नियुक्त करण्यात आले. अखेर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात वाढु लागल्यानंतर हे गार्डन आकर्षक व सुंदर दिसु लागले,यात विविध प्रकारच्यी जवळ शंभर झाडे व गुलाब,गणेरी,कमळ, जास्वंद, झेडु,गलांडा यासह विविध प्रकारच्यी फुलांची झाडी असल्यामुळे हे गार्डन हिरवेगार दिसु लागले आहे.
या गार्डनला जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी २८ आगसष्ट रोजी पाहणी करून पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या सह पोलीस अंमलदार याची प्रंशसा केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या सह उपनिरीक्षक माणिकराव हंबर्डे, पाटील ,व गुन्हे शोधपथक शाखेच्ये पोलीस अंमलदार मलदोडे,कोठेकर, करहाळे,कौठेकर,पवार, जाधव, यांच्या सह अंमलदार ऊपसिथीत होते.