नांदेड विभागीय रेल्वे कार्यालयात 76 वा स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा -NNL


नांदेड|
दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागीय रेल्वे कार्यालयात आज  दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी 76  वा  स्वतंत्रता दिवस  उत्साहात साजरा  करण्यात आला. श्री के. नागभूषण राव, अप्पर  विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी  भारतीय राष्ट्रध्वज फडकवला. आपल्या भाषणात त्यानी नांदेड विभाग तसेच दक्षिण मध्य रेल्वेने या वर्षी केलेल्या विविध कार्याचा गौरव केला आणि  रेल्वे  कर्मचाऱ्यांना सतत कार्यतत्पर  राहण्यास सांगितले. रेल्वे कर्मचारी आणि  त्यांच्या कुटुंबियांना  स्वतंत्रता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

नांदेड रेल्वे विभागात सुरु असलेल्या आणि या वर्षी  पूर्ण झालेल्या कार्याची माहिती दिली. यात प्रामुख्याने किसान रेल्वे चा उल्लेख केला. नांदेड विभागाचे विद्युतीकरणाचे कार्य सुरु आहे.रेल्वे प्रोटेक्शन फोर्स च्या जवानांनी सुंदर परेड सादर केली. सादर केलेल्या परेड चे श्री नागभूषण राव  यांनी निरीक्षण केले.  या प्रसंगी आर.पी.एफ. मधील  श्वान पथकातर्फे विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. उपस्थितांनी त्यांची उत्स्फूर्त पणे दाद दिली.  केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केला.

श्री नागभूषण राव, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक  यांनी श्री अरुण कुमार जैन, महाव्यवस्थापक, (प्रभारी) दक्षिण मध्य रेल्वे यांचा स्वतंत्रता दिनाचा संदेश वाचून दाखविला.या प्रसंगी जय पाटील , वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, रुद्र मूर्ती , वरिष्ठ विभागीय इंजिनियर (समन्वय), श्रीधर,  वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक, जय शंकर चौहान, विभागीय कार्मिक अधिकारी,  मिर्धा, सहायक सुरक्षा आयुक्त  आणि इतर रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि रेल्वे परिवारातील विविध व्यक्ती उपस्थित होत्या. विश्वनाथ सोपान फड, सहायक कार्मिक अधिकारी, नांदेड यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी