भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण -NNL


नांदेड, अनिल मादसवार|
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा सदस्य अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहनराव हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, प्रणिता देवरे-चिखलीकर, किशोर स्वामी, प्रवीण साले, स्वातंत्र्य सैनिकांचे वारस आदी उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाचे हे ध्वजारोहण असल्याने या समारंभास विशेष पोलीस महानिरीक्षक ‍निसार तांबोळी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण

मुख्य ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते पूर्व उच्च प्राथमिक, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी 2020, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी 2021, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी 2021 मधील शहरी व ग्रामीण विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी सन 2020 मध्ये ग्रामीण विभागात जि.प.प्रा.शा. मणिराम थडचा अनिरुद्ध राऊत, संस्कृती पेटकुले तर सीबीएसई विभागात किड्स किंग्डम पब्लिक स्कूलचा प्रद्युम्न तापडिया, ज्ञानमाता विद्याविहारची मधुरा बोडके, नागार्जुना पब्लिक स्कूलचा संकल्प तापडिया, निनाद दगडे, श्रेयस कृष्णापूरकर, निहार देशपांडे. 

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी सन 2020 ग्रामीण विभागात जिज्ञासा विद्यालयचा क्षितिज नरवाडे तर शहरी विभागात केंब्रीज माध्य. विद्यालयाची शिवलिला भिमराव तसेच सीबीएसई विभागात नागार्जूना पब्लिक स्कूलची ऋतिका हाके, हर्षवर्धन सुकलकर, निखिल गिरी, सुमित करखेडे, ज्ञानमाता विद्या विहारची विशाखा कट्टे, स्वरा चालिकवार, प्रथमेश चकरवार, ऑक्सफोर्ड इंटर नॅशनल स्कूलचा क्रिष्णा पाटील, श्रेया बवलगावे, आदित घोडके, ऑक्सफोर्ड द ग्लोबल स्कूलचा श्रेयस लोहारे.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी सन 2021 साठी ग्रामीण विभागात ब्लू बेल्स प्रायमरी इंग्लिश स्कूल नायगावची स्नेहा जमदाडे तर सीबीएसई विभागात ऑक्सफोर्ड इंटर नॅशनल स्कूलची प्राची जाधव, सोहम मंत्रे, नागार्जूना पब्लिक स्कूलचा मयुरेश वागशेट्टे, विघ्नेश राजे, ज्ञानज्योती पोतदार लर्न्स स्कूल बेंदी किनवटचा समर्थ मोरे.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी 2021 ग्रामीण विभागात श्री शिवाजी विद्यालय बारूळ कंधारचा केदार चिद्रावार तर शहरी विभागात गुजराथी हायस्कूलचा सोहम विभुते, केंब्रीज माध्य विद्यालयाचा शरयू पवार तर सीबीएसई विभागात नागार्जूना पब्लिक स्कूलचा पियुष बल्लोरे, अर्चित कोटलवार, सुमित पाटील, किड्स किंग्डम पब्लिक स्कूलचा श्रावण तम्मेवार, सार्थक दुरुगकर, ज्ञानमाता विद्याविहारचा अनिश माचेवार, ऋत्विक पबितवार, अर्थव भुरे, केंद्रीय विद्यालय रेल्वे कॅम्पसची वैष्णवी मुदखेडे, ऑक्सफोर्ड द ग्लोबल स्कूल पयुणीचा कृष्णा पिसलवार, ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल स्कूलचा ज्ञेय बन्नाळीकर या गुणवंत विद्यार्थ्यांचा या पुरस्कार वितरणात समावेश आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी