सिडको हडको परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत -NNL

नगरसेविका सौ इंदुबाई घोगरे यांच्यी मागणी...


नविन नांदेड।
गेल्या अनेक दिवसांपासून संततधार पावसामुळे सिडको हडको परिसरातील मुख्य रस्त्यावरील व अंतर्गत रस्त्यांवरील  मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे तात्त्काळ बुजवण्यात यावेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपा नगरसेविका सौ इंदुबाई शिवाजी पाटील घोगरे यांनी मनपा  आयुक्त डॉ सुनिल लहाने यांना‌ निवेदनाद्वारे दिला आहे.

आयुक्त यांनी दिलेल्या निवेदनात,सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या सिडको हडको मधील मुख्य रस्त्यावरील  व अंतर्गत रस्त्यांवरील अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे व मलनिस्सारण, पाणीपुरवठा योजना या मुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पसरले आहेत, तात्काळ सदरील खड्डे गिटटी व मुरुम चा साह्याने बुजवण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

सिडको हडको परिसरात संततधार पावसामुळे व गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते सिमेंट काक्रेट होणार असल्याने अनेक नागरिक हे मलनिस्सारण, पाणीपुरवठा योजना बाबत पाणी लाईन घेत असल्याने रस्ता खोदल्या ने  व संततधार पावसामुळे नागरीकांना ये जा करणा-या नागरीकासह वाहनधारकांना व शालेय विद्यार्थी यांना नाहक त्रास सोसावा लागत असुन तात्काळ गिटटी व मुरुम टाकुन खड्डे बुजवावेत , अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे नगरसेविका सौ. इंदुबाई शिवाजी पाटील घोगरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी